Horoscope Today 8 January 2026 : आजचा दिवस 8 राशींसाठी धोक्याचा, फक्त 4 राशींवर असणार दत्तगुरुंचा आशीर्वाद, वेळोवेळी लागणार संकटाची चाहूल, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 8 January 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य.

Horoscope Today 8 January 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 8 जानेवारी 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार गुरुवार आहे. आजचा दिवस दत्तगुरुंना समर्पित आहे. त्यानुसार आज दत्तगुरुंची पूजा केली जाते. आणि उपवास ठेवून मनातील इच्छा व्यक्त केली जाते. तसेच, ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today).
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस कठीण असणार आहे. आज तुम्ही मानसिक तणावाचे शिकार होऊ शकतात. तुमची पर्सनालिटी जरी स्ट्ऱॉंग असतील तरी मानसिकदृष्ट्या तुमचं खच्चीकरण केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या मनातील भावना इतर कोणाशीही शेअर करु नका. मुलांच्या आरोग्याबाबतही चिंता जाणवेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ रासीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्ही घरच्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आरोग्याच्या बाबतीत देखील तुम्हाला रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल.मात्र, तुम्हाला सतत एखादी चिंता सतावेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. तुमच्या व्यवसायात देखील अनेक आव्हानं तुमच्यासमोर उभी असतील. अशा वेळी जास्त ताण घेऊ नका. तसेच, मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. भूतकाळातील गोष्टींचा वर्तमानकाळावर परिणाम होऊ देऊ नका.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. आज तुमचे शत्रू तुमच्या वाईटावर उठू शकतात. अशा वेळेस तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अन्यथा गोष्टी बिघडू शकतात. तसेच, तुमचं आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला ना लाभ ना तोटा होईल. तसेच, तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक असाल. नकारात्मक गोष्टींचा प्रभाव तुमच्यावर होऊ देऊ नका. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नंतर मिळणार आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस फार खर्चिक असणार आहे. आज तुमचे जुने व्यवहार पुन्हा वर डोकावू शकतात. त्याचा तुमच्या उद्यावर देखील परिणाम होऊ शकतो. तसेच, जर तुम्ही एखाद्याकडून पैसे घेतले असतील तर परत द्या. कोणत्याही गैरसमजुतीत राहू नका.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. काही कारणास्तव तुमचं मन थोडं चंचल राहील. पण, याचा तुमच्या दिवसावर काही एक परिणाम होणार नाही. सकारात्मक ऊर्जेसाठी धार्मिक गाणी ऐका. तसेच, देवाचं नामस्मरण करा.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी देखील सहकाऱ्यांबरोबर विनाकारण वाद होण्याची शक्ता आहे. मुलांच्या आरोग्याबाबत तुम्हाला चिंता सतावेल. तसेच, काही वस्तू दान केल्यास तुम्हाला सकारात्मक वाटू शकतं.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या अनेक कामांतून तुमची सुटका होईल. त्यामुळे तुम्हाला थोडं प्रसन्न वाटेल. पण, आणखी एक नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. ती तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग खुले होतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे आज पूर्ण करु शकता. तुमच्या करिअरला वेगळं वळण लागेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. भगवान हनुमानाची तुमच्यावर विशेष कृपा असल्यामुळे तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असेल. तुमच्या अंतर्मनाला आज योग्य दिशा मिळेल. तसेच, करिअर आणि शिक्षणात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. मानसिक शांती लाभेल. आत्मविश्वास वाढेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















