Horoscope Today 7 October 2025: आजची आश्विन पौर्णिमा 'या' 7 राशींसाठी भाग्याची! लक्ष्मी-गणेशाची मोठी कृपा, 12 राशींचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 7 October 2025: आजचा मंगळवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 7 October 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 7 ऑक्टोबर 2025, आजचा वार मंगळवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज तरुण वर्ग आपला जोडीदार निवडण्यात यशस्वी होईल, विवाह ठरतील, महिला मंगल कार्याच्या गडबडीत राहतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज कोणत्याही अडचणीतून मार्ग काढण्यात यशस्वी व्हाल, तुम्हाला आवश्यक वाटणारी सुखे हात जोडून उभी राहतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज परदेशी प्रवासाचे बेत ठरतील, जोडीदाराबरोबर सुसंवाद साधण्यासाठी आवश्यकता संधी मिळतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज घरात आनंद आणि उत्साह राहील, घरामध्ये तरुण वर्गाची येजा राहील, त्यामुळे हलकेफुलके वातावरण मध्ये रमून जाल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज कल्पनाशक्ती चांगली राहील तुम्हाला जे वाटतं ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त कराल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज थोडा तापटपणा आवरा, अस्थिर आणि चंचल मनोवृत्तीला तोंड द्यावे लागेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज आर्थिक स्थिती सुधारेल, महिला घरातील सणसमारंभाच्या तयारीत गुंतून जातील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज कठीण प्रसंगातही मानसिक अशांततेवर मात करून पुढे याल, स्वतःमध्ये असलेल्या कलेला न्याय द्याल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज नवीन नवीन कल्पनांचा मागवा घ्याल, घरामध्ये मनपसंत बदल करण्यात शक्ती खर्च कराल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज स्वतःबरोबरच घरातील कलाकारांनाही उत्तेजन द्याल. जोडीदाराला समजून घ्याल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज व्यवसाय ज्यादा कामासाठी वेळ काढाल. त्यामुळे मिळालेल्या यशाची किंमत तुम्हाला कळेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज कामाचे योग्य नियोजन करण्याची दृष्टी मिळेल. येणारा प्रत्येक क्षण तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल.
हेही वाचा :
Shani Dev: तब्बल 100 वर्षांनंतर यंदाची दिवाळी 'या' 3 राशींसाठी भरभराटीची! शनिचा शक्तिशाली धन राजयोग, भाग्य घेऊन येतोय...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















