Horoscope Today 31 August 2025: ऑगस्टचा शेवटचा दिवस 'या' 6 राशींसाठी भाग्याचा! गौरी आवाहनच्या दिवशी ग्रहांचे शुभ योग, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 31 August 2025: आजचा रविवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 31 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 31 ऑगस्ट 2025, आजचा वार रविवार आहे. आज ज्येष्ठा गौरा आवाहन असल्याने ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आजचा दिवस खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात नेहमीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतील, परंतु कामाच्या ठिकाणी असलेल्या उत्साही वातावरणामुळे कामाचा फdशा पाडाल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज घरामध्ये मनाजोगती खरेदी कराल, नोकरीमध्ये वरिष्ठ त्यांच्या स्वार्थापोटी तुम्हाला काही सवलती देतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज तुमच्या कामाचा मोबदला मिळेल, घरामधील व्यक्तींचे हट्ट पुरवाल, परंतु त्यांच्याकडून तशा अपेक्षाही करावी
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज महिलांना घर आणि बाहेरच्या जगात तारेवरची कसरत करावी लागणार आहे, पूर्वी पेरलेले आज उगवेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज जगणं समृद्ध करणारे कितीतरी क्षण आज अनुभवाल. स्वप्नांची पूर्तता होईल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज आपल्याला आवडणारे व्यक्ती भेटतील, लोकांसाठी खूप काही करत असताना तुझे आहे तुझं पाशी हा अनुभव घाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची आवड राहील, इच्छांना आकांक्षांचे पंख मिळतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज प्रकृतीकडे दूरदृष्टीने लक्ष द्यावे लागेल, आहार विहार व्यायाम यांचे गणित चांगले बसवा
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो मन स्वस्थ असेल, तुमच्या व्यवसायाचा परदेशाशी संबंध असेल त्या कामांना चालना मिळेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज महिलांच्या लहरी स्वभावामुळे घरामध्ये ताण-तणाव निर्माण होतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज नवीन गोष्टी करण्याची आवड निर्माण होईल, दूरवरच्या प्रवासाचे योग येतील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज व्यवसायात पुढे काही गाठायचं आहे हा निश्चय मनात कराल, आत्मविश्वासाचा बोट धरून पुढे चालत राहाल.
हेही वाचा :
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी सप्टेंबरचा पहिलाच आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















