एक्स्प्लोर

Horoscope Today 30 October 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 30 October 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 30 October 2024 : आज बुधवारचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. दिवाळी सुरु झाली आहे त्यामुळे सगळीकडे प्रसन्नतेचं वातावरण आहे. अशातच आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी चांगले तर काही राशींसाठी वाईट परिणाम आणू शकतो.आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असमार आहे. आज तुम्हाला आरोग्याशी संबंधित चिंता करण्याची गरज नाही. तुमची तब्येत एकदम ठणठणीत असणार आहे. मात्र, कुटुंबात काही कारणामुळे तणाव जाणवेल. अशावेळी तुमचं मन नाराज असेल. कामानिमित्त तुम्हाला बाहेर जावं लागू शकतं. तसेच, तुमच्या व्यवसायात काही चढ-उतार होऊ शकतात. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या विश्वासास तुम्ही आज पात्र ठराल. तसेच, तुमच्या मुलाच्या करिअर संबंधित तुमच्या ज्या काही समस्या होत्या त्या दूर होतील. कुटुंबातील समस्या सामंजस्याने सोडविण्यात तुम्हाला यश येईल. तसेच, दिवाळी असल्या कारणाने तुम्ही काही सामान खरेदी करु शकता. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायक असणार आहे. आज काही गोष्टींच्या विचारात तुम्ही अस्वस्थ असाल. तसेच, तुम्ही जर वाहन चालवणार असाल तर सावधानतेने चालवा. तसेच, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला उपवास करावा लागू शकतो. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. 

कर्क रास (Cancer Today Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला सतत यश मिळत नसलेल्या आज काही ठोस निर्णय तुम्हाला घ्यावे लागू शकतात. व्यवसायात बदल करावा लागेल. तसेच, काही कारणानिमित्त तुम्हाला तुमच्या जोडीदाराची गरज लागू शकते. आज तुम्हाला तुमच्या आरोग्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं लागेल. 

सिंह रास (Leo Today Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही नुकसान होऊ शकतं. त्याचा सामना तुम्हाला करावा लागेल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे पैसे आज तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलामुळे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये देखील बदल करण्याची गरज आहे. 

कन्या रास (Virgo Today Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला व्यवसायात काही बदल करावा लागू शकतो. तसेच, दिवाळीच्या निमित्ताने मित्रांबरोबर तुमच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे तुम्ही खूप खुश असाल. कामाच्या ठिकाणी वातावरण प्रसन्न असेल. आज तुमच्यावर बॉसकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात येऊ शकते. 

तूळ रास (Libra Today Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्ही निश्चिंत असाल. तसेच, घर, वाहन किंवा एखादी प्रॉपर्टी तुम्ही विकत घेऊ शकता. काही कामानिमित्ताने तुम्हाला बाहेर जावं लागू शकतं. तसेच, पार्टनरसंबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते संवाद साधून सोडवू शकता. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. कोर्ट कचेरीच्या संदर्भात काही काम असेल तर तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल. तसेच, जे तरुण अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच मनासारखी नोकरी मिळू शकते. आज तुमची जुन्या मित्राबरोबर भेट होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा द्याल. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. तसेच, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन नोकरी मिळू शकते. वाहनाचा वापर जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला सांभाळून वाहन चालवण्याची गरज आहे. तसेच, घरातील वातावरण प्रसन्न असेल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुमचं आरोग्य ठणठणीत असेल. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. आज समाजातील काही महत्त्वाच्या व्यक्तींशी तुमच्या भेटीगाठी होतील. तसेच, व्यवसायाची संबंधित आज तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. तसेच, जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं असेल तर तुम्ही निर्णय घेऊ शकता. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. एखाद्या गोष्टीबाबत अनेक दिवसांपासून तुमच्या मनात जे विचार सुरु होते ते आज दूर होतील. त्यामुळे तुम्हाला समाधानी आणि प्रसन्न वाटेल. तसेच, कामाच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा करु नका. अन्यथा तुम्हाला तो महागात पडू शकतो. कुटुंबियांबरोबर धार्मिक स्थळाला भेट द्याल. संध्याकाळचा वेळ चांगला जाईल. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभदायी असणार आहे. आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, कामानिमित्त तुम्हाला परदेशी देखील जावं लागू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा सुट्टीचा काळ असल्या कारणाने ते खूप खुश असतील. वाहन चालवताना काळजी घेणं गरजेचं आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:       

Horoscope Today 30 October 2024 : आज 3 राशींचा दिवस टेन्शन फ्री, तर 'या' राशींचा खिसा होणार रिकामा, वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
India China complete Disengagement in Depsang Demchok : भारत-चीन सीमेवर डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण; दोन्ही सैनिक एकमेकांना उद्या मिठाई भरवणार!
भारत-चीन सीमेवर डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण; दोन्ही सैनिक एकमेकांना उद्या मिठाई भरवणार!
ठाकरेंची तोफ धडाडणार, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा
ठाकरेंची तोफ धडाडणार, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : हिरेनची हत्या होणार हे देशमुखांना माहित होतं की नाही? : देवेंद्र फडणवीसABP Majha Headlines : 7 PM : 30 OCT 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaDevendra Faadnavis : मलिकांना अधिकृत उमेदवारी देऊ नका सांगितलं तरी उमेदवारी दिली  : फडणवीसSupriya Sule On Ajit Pawar : RR Patil यांच्याबाबत अजित पवारांचं वक्तव्य अत्यंत वेदनादायी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
India China complete Disengagement in Depsang Demchok : भारत-चीन सीमेवर डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण; दोन्ही सैनिक एकमेकांना उद्या मिठाई भरवणार!
भारत-चीन सीमेवर डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण; दोन्ही सैनिक एकमेकांना उद्या मिठाई भरवणार!
ठाकरेंची तोफ धडाडणार, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा
ठाकरेंची तोफ धडाडणार, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा
भिवंडीत कारमध्ये घबाड, रोकड जप्त; मतदारसंघात स्टॅटिक सर्विलन्स टीमची कारवाई
भिवंडीत कारमध्ये घबाड, रोकड जप्त; मतदारसंघात स्टॅटिक सर्विलन्स टीमची कारवाई
Jayant Patil : फडणवीसांनी अजित पवारांना बोलवून आरोपांची फाईल दाखवली हा दोघांच्या कॅरेक्टरवर प्रकाश टाकणारा प्रकार; आबांवरील आरोपांवर जयंत पाटलांचा हल्लाबोल
फडणवीसांनी अजित पवारांना बोलवून आरोपांची फाईल दाखवली हा दोघांच्या कॅरेक्टरवर प्रकाश टाकणारा प्रकार; आबांवरील आरोपांवर जयंत पाटलांचा हल्लाबोल
America Election : अमेरिकेत निवडणुकीसाठी राहिले फक्त सात दिवस, पण 7 राज्यांमध्ये कमला हॅरिस यांना धोक्याची घंटा!
अमेरिकेत निवडणुकीसाठी राहिले फक्त सात दिवस, पण 7 राज्यांमध्ये कमला हॅरिस यांना धोक्याची घंटा!
Video: फडणवीस म्हणाले, मनोज जरांगेंना दिवसांतून तीनवेळा मीच का दिसतो; आता, पाटलांनीही केला पलटवार
Video: फडणवीस म्हणाले, मनोज जरांगेंना दिवसांतून तीनवेळा मीच का दिसतो; आता, पाटलांनीही केला पलटवार
Embed widget