Horoscope Today 30 May 2025: आज शुक्रवार दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने धनलाभाचे योग, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 30 May 2025: आजचा शुक्रवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 30 May 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 30 मे 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. कारण आज शनि जयंती आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज घरामध्ये स्वतःच्या मताशी ठाम राहाल, कोणतीही तडजोड करण्याच्या मनस्थितीत नसाल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज हाता खालच्या लोकांच्या मानी स्वभावाला तोंड द्यावे लागेल. तुमच्या कामांमध्ये घरातील लोकांचा सहभाग असेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज महिला घरातील लोकांच्या मर्जीस उतरतील, घरामधील अस्थिरता वाद विवाद संपुष्टात येतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज ग्रह सौख्यात भर पडेल घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मताप्रमाणे वागावे लागेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज तुमच्या विचारांचा दृष्टिकोन बदलावा लागेल, नोकरी व्यवसायात नवीन संशोधन करून वरिष्ठांना खुश ठेवाल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना काम केल्याचे समाधान मिळण्याचा काळ आहे
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करून विद्यार्थ्यांना अभ्यासाची नवीन दालने खुली करून देण्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो व्यवसायात पार्टनर बरोबर जमवून घ्यावे लागेल, महिलांनी स्वतःचे आरोग्य जपावे.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज जोडीदाराची काही महत्त्वाची कामे रखडतील, त्यासाठी तुम्हाला थोडी मदत करावी लागेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज घरात आणि बाहेर दोन्हीकडे लक्ष द्यावे लागल्यामुळे थोडी तारेवरची कसरत करावी लागेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल, याबाबतीत तुम्ही पुढाकार घेण्याची शक्यता जास्त आहे
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज व्यवसायात भीक नको पण कुत्रा वर अशी म्हणण्याची वेळ येईल, काम पूर्ण होण्यासाठी द्यावा लागणारा मोबदला न परवडणारी असल्यामुळे एखादी योजना रद्द करावी लागेल.
हेही वाचा :
June 2025 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे जून महिन्यात नशीब पालटणार? नवा महिना कसा असणार? मासिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















