Horoscope Today 3 November 2025: आजचा सोमवार 'या' 7 राशींसाठी भाग्यशाली! भोलेनाथ करतील संकट दूर, इच्छापूर्तीचा दिवस, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 3 November 2025: आजचा सोमवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 3 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 3 नोव्हेंबर 2025, आजचा वार सोमवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज नवीन योजना आणि कल्पना साकार करण्यासाठी ग्रहांची साथ तुम्हाला चांगली मिळणार आहे
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांचे शिक्षणात प्रगती होईल, शैक्षणिक दृष्ट्या संशोधन वृत्ती राहिल्यामुळे तर याचा विचार चांगल्या पद्धतीने करता येईल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज शिक्षणासाठी दुसऱ्यांना मदतीचा हात द्याल, धार्मिक गोष्टींची आवड राहील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे बेत ठरतील, लेखकांच्या लिखाणास प्रसिद्धी मिळेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज शिक्षक प्राध्यापकांच्या प्रसिद्धीत भर पडेल, महिला मुलांना यथायोग्य सहकार्य देतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज मानसिक दलायमान अवस्था राहिल्यामुळे, निर्णय घेताना दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्या कल्पना नेहमीच विधायक असतात, हे सर्वांना आज जाणवेल, त्यानुसार तुमचे कौतुकही होईल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायातील आजूबाजूचे वातावरण तुम्हाला काम करण्यासाठी पुरत नसल्यामुळे कामाविषयी ओढ वाटणार नाही
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज कामामध्ये दिरंगाई होण्याची शक्यता, जुनी मित्रमंडळी भेटतील, नवीन ओळखी वाढतील
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा मानस राहील, कीर्ती प्रसिद्धीचे योग येतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना आपली बौद्धिक क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल, लेखकांना ललित लिखाणात गती मिळेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज सर्व बाबतीत वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल, फक्त कामाचा अहंकार न ठेवता काम केले तर उत्कृष्ट काम होईल.
हेही वाचा>>
Baba Vega Prediction: 2025 वर्ष संपण्यापूर्वीच 'या' 4 राशी कोट्याधीश होण्याच्या मार्गावर! बाबा वेंगाची अद्भूत भविष्यवाणी, धनसंपत्ती वाढण्याचे संकेत..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















