एक्स्प्लोर

Horoscope Today 29 June 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 29 June 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 29 June 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - जे मार्केटिंगच्या क्षेत्रात आहेत ते पुढील आठवड्यासाठी चांगला प्लॅन तयार करू शकतात. असे केल्याने तुमची कामे वेळेत पूर्ण होतील.  

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य निरोगी राहावं यासाठी पौष्टिक आहार घ्या. तरच तुमची रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहील. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गाबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांत चांगला नफा मिळेल. नवीन उत्पन्नाचे सोर्सेसही उपलब्ध होतील. 

कुटुंब (Family) - आज तुमचा कुटुंबियांबरोबर वेळ अगदी आनंदात जाणार आहे. हा आनंदाचा क्षण तुमच्या नेहमी स्मरणात राहील. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी थोडं सावध राहण्याची गरज आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांचा मूड बघूनच एखादा प्रस्ताव मांडावा.

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तुम्हाला दिर्घकाळापासून सुरु असलेली दातदुखीची समस्या पुन्हा जाणवू शकते. अशा वेळी लगेच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. 

व्यापार (Business) - जे व्यापारी परदेशात व्यापार करतायत. त्यांचा व्यवसाय चांगला नफ्यात जाणार आहे. 

प्रेमसंबंध (Relationship) - कोणाच्याही सांगण्यावरून तुमच्या जोडीदारावर संशय घेऊ नका. तुमच्या जोडीदारावरचा विश्वास किती आहे हे पाहण्याची वेळ आलीय. 

मिथुन रास (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - शिक्षक पेशातील जे लोक आहेत त्यांना आज कामाच्या ठिकाणी दिवस फार आनंदात जाणार आहे. त्यामुळे कामातही तुमचं मन रमणार आहे. 

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास शरीराला थोडा वेळ विश्रांती द्या. तुम्हाला पाण्याची अॅलर्जी सुद्धा होऊ शकते. 

व्यापार (Business) - व्यापारी वर्गाचा दिवसही सामान्य राहणार आहे. कामात ना नफा ना तोटा ही परिस्थिती आज असेल. 

कर्क रास - (Cancer Today Horoscope)

नोकरी (Job) - तुम्ही ऑफिसची कामे तंत्रज्ञानाद्वारे पूर्ण करू शकाल, ज्यामुळे तुमचे अधिकारी तुमच्यावर खूप खूश होतील आणि ते तुमचा पगार देखील वाढवू शकतात.

व्यवसाय (Business) - तुम्हाला व्यवसायाशी संबंधित कोणत्याही कायदेशीर बाबीपासून काही काळ दिलासा मिळू शकतो.  परंतु तुम्ही कायदेशीर कागदपत्रे पूर्ण ठेवावीत, अन्यथा तुमच्या व्यवसायात अडचणी येऊ शकतात.  

तरुण (Youth) - कोणताही कोर्स करायचा असेल किंवा कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर आजचा दिवस त्यांच्यासाठी योग्य असेल. 

आरोग्य (Health) - तुमची तब्येत अचानक बिघडू शकते, यासाठी तुम्ही थोडे सावध राहून औषधे वेळेवर घ्या, यामुळे तुम्हाला लवकर बरे होण्यास मदत होईल. खाणेपिणे जरूर वर्ज्य करा. 

सिंह रास (Leo Today Horoscope)  

नोकरी (Job) - दिवस चांगला जाईल.नोकरीच्या ठिकाणी काही काम कराल ते संयमाने करा. तुम्ही तुमची नोकरी सोडण्याचा विचार करू शकता. पण तुम्ही हा विचार सोडून द्यावा

व्यवसाय (Business) - तुमच्या शेजारी काही वाद चालू असतील तर त्यापासून स्वतःला दूर ठेवा.  अन्यथा, वादात अडकून तुम्ही अडचणीत येऊ शकता आणि  याचा परिणाम चांगला होणार नाही. 

आरोग्य (Health) - तुम्हाला दमा असेल, तर  दम्याच्या रुग्णांना खूप काळजी घ्यावी लागेल. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, याबाबत गाफील राहू नका, लवकरात लवकर उपचार घ्या

कन्या रास (Virgo Today Horoscope)    

नोकरी (Job) - दिवस चांगला जाईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील.  ते तुमची बढतीही करू शकतात.  

व्यवसाय (Business) - तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या नवीन संधी मिळतील. तसेच, तुमच्या व्यवसायाबाबत एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका.

तरुण (Youth) - तुम्ही खूप आनंदी असाल.  तुमच्या लहान भाऊ-बहिणींचे प्रेम आणि आदर पाहून तुम्ही खूप आनंदी व्हाल आनंद व्यक्त करण्यासाठी भेटवस्तू वगैरे देऊ शकता. त्यामुळे त्यालाही खूप आनंद होईल.

आरोग्य (Health) - तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि तुमचे आवडते काम समाविष्ट करा. तुम्ही तुमच्या जीवनात जितके मजा कराल तितके तुम्ही निरोगी व्हाल. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका, चिंतामुक्त जीवन जगा.

तूळ रास (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - तुमच्या कार्यालयातील परिस्थिती खूप समाधानकारक असेल. तुम्हाला खूप शांतता लाभेल, परंतु तुम्हाला कामाचे थोडे ओझे वाटू शकते. 

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांसाठी दिवस चांगला राहील. तुम्ही काही कामे सहजपणे पूर्ण करू शकाल आणि काही कामांसाठी तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतील, परंतु त्यानंतरही तुम्हाला यश मिळू शकणार नाही.

आरोग्य (Health) - आरोग्याविषयी बोलायचे झाले तर तुम्हाला सर्दी इत्यादीमुळे समस्यांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे तुम्ही उबदार कपडे घालावेत. पोटदुखीची समस्या देखील तुम्हाला सतावू शकते.   

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर, त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाणाऱ्या लोकांना भविष्यात काय हवे आहे आणि त्यांना काय करायचे आहे हे त्यांचे प्राधान्यक्रम ठरवावे लागेल. 

व्यवसाय (Business) - तुम्ही तुमच्या व्यवसायात आराम करणे टाळले पाहिजे. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे न्यायचा असेल तर तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल अन्यथा विश्रांती तुमच्या उद्यासाठी खूप हानिकारक असू शकते. तुमच्या व्यवसायात तुम्हाला नुकसान होऊ शकते.   

आरोग्य (Health) - महिलांना हार्मोनल असंतुलनामुळे जास्त काळजी वाटू शकते. चांगल्या डॉक्टरांना भेटून तिची तपासणी करून घ्यावी आणि औषधे वेळेवर घेत राहावीत. तुमच्या समस्या लवकरच संपुष्टात येतील.  

धनु  रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - ऑफिसचे काम करताना तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांसोबत राहिल्यास तुमचा विचारही सकारात्मक राहील. 

व्यवसाय (Business) - आयुर्वेदिक औषधांचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना उद्या मोठा नफा मिळू शकतो. यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. 

आरोग्य (Health) - तुमचे वजन झपाट्याने वाढत असेल तर तुम्ही वजन कमी करण्यासाठी सज्ज व्हा आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येत नियमित व्यायाम आणि आहाराचा समावेश करा.   

मकर रास (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवलं जाईल. कामात चपळता दाखवा. 

व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायाशी संबंधित विरोधक आज तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतात. यासाठी कामाच्या ठिकाणी थोडी सतर्कता दाखवा. 

युवक (Youth) - जर काही कारणास्तव तुमच्या अभ्यासात ब्रेक लागला असेल तर तुम्ही अभ्यास पुन्हा सुरु करू शकता. 

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका. अन्यथा दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतो. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या पगारातील काही हिस्सा भौतिक वस्तूंमध्ये खर्च करण्यात जाईल. पण, त्यातही तुम्हाला आनंद मिळेल. 

व्यापार (Business) - जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु करणार असाल तर तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. ही वेळ योग्य आहे. 

लव्ह लाईफ (Relationship) - आज तुमचे तुमच्या पार्टनरबरोबर काही कारणास्तव खटके उडू शकतात. सामंजस्याने निर्णय घ्या. 

आरोग्य (Health) - महिला चेहऱ्याशी संबंधित समस्याने त्रस्त असू शकतात. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 

मीन रास (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - ग्रहांची स्थिती पाहिल्यास तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. 

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाने आपल्या सर्व ग्राहकांना एकाच मापात मापणे बंद करावे. सर्व ग्राहकांना समान वागणूक द्या. ग्राहकांना छोटं समजण्याची चूक करू नका. 

युवक (Youth) - आज तुम्हाला नियमांचं पालन करावं लागेल. मग ते शाळेच्या संदर्भात असो, महाविद्यालय किंवा अगदी घरी. कडक शिस्त पाळा. 

आरोग्य (Health) - आज कोणतीही जड वस्तू उचलताना काळजी घ्या. वातावरणातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणा होऊ शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Budh Uday 2024 : बुध ग्रहाचा मिथुन राशीत उदय; 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, पुढचे काही दिवस जगणार राजासारखं जीवन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
Sanjay Raut :  शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
Donald Trump : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Republic Day Air Show : प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती, कर्तव्यपथावर सोहळाGulen bury syndrome Death in Maharashtra : पुण्यात काम करणाऱ्या सोलापुरच्या तरुणाचा गुलेन बरी सिंड्रोमने मृत्यूPune Ajit Pawar Republic Day : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, पालकमंत्री अजित पवारांकडून ध्वजारोहणMohan Bhagwat Bhiwandi Full Speech : प्रजासत्ताक दिनानिमित्त मोहन भागवत यांचं भिवंडी येथे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
Sanjay Raut :  शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
Donald Trump : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
"विकीच्या आवाजात दम नाही, शरद केळकर हवा होता", 'छावा'च्या ट्रेलरवर निगेटिव्ह प्रतिसाद, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
परी म्हणून की सुंदरा... खूपच ग्लॅमरस आहे राजेश खन्नाची नात, आजी डिंपल कपाडियासोबतचा फोटो व्हायरल
परी म्हणून की सुंदरा... खूपच ग्लॅमरस आहे राजेश खन्नाची नात, आजी डिंपल कपाडियासोबतचा फोटो व्हायरल
Gautam Gambhir and Suryakumar Yadav : कसोटीत काही केल्या डाळ शिजेना, वनडेतही अग्नीपरीक्षा होणार, पण टी-20 मध्ये कॅप्टन सूर्या आणि गंभीर गुरुजींची जोडी जमली! एकदा आकडेवारी बघाच
कसोटीत काही केल्या डाळ शिजेना, वनडेतही अग्नीपरीक्षा होणार, पण टी-20 मध्ये कॅप्टन सूर्या आणि गंभीर गुरुजींची जोडी जमली! एकदा आकडेवारी बघाच
Embed widget