Horoscope Today 28 October 2025: आजचा मंगळवार 'या' 6 राशींसाठी भाग्याचा! श्रीगणेश करणार संकटमुक्त, गूड न्यूज मिळणार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 28 October 2025: आजचा मंगळवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 28 October 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 28 ऑक्टोबर 2025, आजचा वार मंगळवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज ज्यांचा कापड टेलरिंगचा व्यवसाय आहे, त्यांना उत्तम ग्रहमान, कलेशी निगडित व्यवसाय असेल त्यांना संधी मिळतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचा रुबाब आढळेल, आपल्या मानमर्यादा सांभाळण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज धाडस आणि साहस हातात हात घालून जातील, त्यामुळे काम करण्याचा वेग वाढेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज मनावर ताबा राखण्यासाठी मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतील, तुमच्या बोलण्यामुळे कोणी दुखावत नाही ना याची काळजी घ्या
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज भांडण तंटे करण्याचा मूड राहील, प्रकृतीच्या तक्रारी जाणवायला लागतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज वाहने जपून चालवा, आईशी थोडे वाद-विवाद संभवतात, महिला थोड्या उधळपट्टी करतील.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज कोणत्याही बाबतीत स्वतंत्र विचार केल्यामुळे मनाजोगते वागता येईल, या भ्रमात राहाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज शेवटच्या क्षणापर्यंत अति जहालपणे लढा देण्याचा तुमच्या स्वभावाचा आज फायदा होईल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज पिढी जात चालत आलेल्या रूढी परंपरा विषयीचे पारंपरिक विचार बदलून आधुनिकतेकडे झुकाल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात योग्य संधी न मिळाल्यामुळे प्रचंड झगडा करावा लागेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज कामांची गती मंद राहील, स्थैर्य मिळण्यासाठी कष्टाचे डोंगर पार करावे लागतील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज विचार आणि विवेकी वृत्तीमुळे आजूबाजूच्या लोकांकडून तुम्हाला चांगलीच पावती मिळेल.
हेही वाचा>>
Ketu Transit: 2026 मध्ये भल्याभल्यांना घाम फुटणार, पण 'या' 4 राशी मौजमजा करणार! केतू अचानक देणार धनलाभ, संपत्तीत वाढ, रातोरात होणार बदल..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















