एक्स्प्लोर

Horoscope 27 March 2022: मेष, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांनी सावध राहा! जाणून घ्या 'आजचे राशीभविष्य'

Horoscope Today 27 March 2022 : 27 मार्च 2022 हा दिवस मेष, कर्क आणि मकर राशीच्या लोकांसाठी विशेष काळजी घेण्याचा आहे. जाणून घ्या 12 राशींचे आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 27 March 2022, Daily Horoscope : पंचांगानुसार, आज 27 मार्च 2022 रोजी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. आज चंद्र मकर राशीत बसेल, तर उत्तराषाद नक्षत्र आहे. कसा असेल आजचा दिवस, जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजच्या दिवशी सर्वांशी ताळमेळ ठेवावा लागेल. ग्रहांच्या नकारात्मक प्रभावामुळे समोरच्या व्यक्तीसोबत वाद संभवतो. कार्यक्षेत्रात काम जास्त राहील, पण नाराज होऊ नका. काम न झाल्यास सहकार्‍यांशी वाद होऊ नयेत, याची काळजी घ्यावी लागेल. व्यापाऱ्यांनीही स्पर्धकांकडे लक्ष द्यावे, स्पर्धेमुळे व्यवसाय अडचणीत आणू नका. आरोग्याच्या दृष्टिकोनातून जड वस्तू उचलणे टाळावे, कंबरेवर ताण आल्याने त्रास होऊ शकतो. कुटुंबासोबत अनावश्यक प्रवासाचा बेत असेल, तर तो आज टाळणेच योग्य राहील.

वृषभ (Taurus Horoscope) : आज सकारात्मकता आणि सतर्कता या दोन्ही गोष्टी ठेवाव्या लागतील. कारण, कदाचित काही फायदा दाखवून एखादा व्यक्ती त्याचा हेतू साध्या करण्याचा प्रयत्न करेल. नकारात्मक भावनांना तुमच्यावर वर्चस्व मिळवू देऊ नका. अधिकृत परिस्थितीबद्दल बोलायचे झाले, तर तांत्रिक अडचणींमुळे कामात अडथळे येतील. टेलिकॉमशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास पूर्ण करून ठेवावा. तुम्ही स्नायूंच्या दुखण्याला बळी पडू शकता, त्यापासून मुक्त होण्यासाठी मसाजची मदत घेणे फायदेशीर ठरेल. कौटुंबिक वादात मध्यस्थी करावी लागेल.

मिथुन (Cancer Horoscope) : आज इतर कामांसोबतच देव पूजा करण्याची जबाबदारीही घ्या. बँक क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागू शकते. व्यापारी वर्गाने मोठ्या ग्राहकांना खूश करण्यासाठी चांगल्या ऑफर्स द्याव्यात. जर, तुम्ही कानाशी संबंधित समस्येकडे खूप दिवसांपासून दुर्लक्ष करत असाल तर, आता तुम्ही डॉक्टरांकडून उपचार करून घ्या, नाहीतर दुखणे वाढतच जाईल. तणावाखाली धावपळ करणाऱ्या महिलांना आज दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कर्क (Cancer Horoscope) : आजच्या दिवशी या राशीच्या लोकांनी कामांचे नियोजन करावे. नियोजनासाठी वेळ लाभदायक आहे. लक्षात ठेवा, शक्ती नेहमीच काम करत नाही, युक्तीचाही वापर करा. कार्यक्षेत्रात तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, कारण तुमच्यासमोर आलेल्या आव्हानांचे शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे. औषधांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस लाभदायक असणार आहे. पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहा. जर, तुम्ही घरातील कोणत्याही सदस्याकडून कर्ज घेतले असेल, तर ते आजच परत करा. अन्यथा पैसे वादाचे कारण बनू शकतात.

सिंह (Leo Horoscope) : आज सामाजिक वर्तुळ अधिक मजबूत करण्यासाठी काही नवीन संधी शोधल्या पाहिजेत. नोकरीबद्दल बोलायचे झाल्यास, आज तुमची गणना चांगल्या सहकार्‍यांमध्ये केली जाईल. तसेच, तुम्हाला पदोन्नतीसह टीमचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. स्टेशनरीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, मित्रांसोबत माहितीपूर्ण गोष्टींवर चर्चा करावी. सांधेदुखीच्या रुग्णांना वेदनांचा सामना करावा लागेल, तसेच अशक्तपणामुळे प्रकृती खालावू शकते. कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. 

कन्या (Virgo Horoscope) : आजच्या दिवशी अनावश्यक काम करणे टाळा, वेळेचा अपव्यय होणार नाही यावर लक्षात ठेवा. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ऊर्जा संतुलित प्रमाणात खर्च करा. एखाद्या व्यक्तीवर आर्थिकदृष्ट्या जास्त अवलंबून राहणे योग्य नाही. ऑफिसमध्ये एखादे कठीण आव्हान असेल, तर ते मोठ्या उत्साहाने स्वीकारावे आणि आत्मविश्वासाने ते पूर्ण करावे. व्यापार्‍यांनी आर्थिक बाबी लक्षात ठेवाव्यात, उर्वरित स्थिती सामान्य आहे. खराब आहारामुळे पोट खराब होऊ शकते, बाहेरचे अन्न खाणे देखील टाळा. घरात आईची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, सतर्क राहण्याचा सल्ला.

तूळ (Libra Horoscope) : आज मनात अधिक प्रमाणात विचार येतील, त्यामुळे सावध राहून आपली विवेक बुद्धी सक्रिय ठेवा. गरज पडल्यास आधी स्वत:शी चर्चा करा. अधिकारी कोणतेही काम करत असले तरी, घाईमुळे कामात गुणवत्ता नाही, असे होऊ नये म्हणून त्याची पुनर्तपासणी करा. व्यापार्‍यांसाठी दिवस चांगला आहे, ग्राहकांची ये-जा सुरू राहील, अशा स्थितीत थंड राहून ग्राहकांची मागणी पूर्ण करावी लागणार आहे. जर, तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत सांधेदुखीची समस्या असेल, तर त्यासंबंधीची औषधे आणि व्यायाम करायला विसरू नका. आपल्या क्षमतेनुसार गरजू मुलांना मिठाई दान करा.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : या दिवशी मत्सर करणाऱ्यांना महत्त्व देण्याची गरज नाही, तर दुसरीकडे अहंकाराशी संघर्षही टाळा. कार्यालयातील कामे नियमितपणे करा. तुम्ही ऑफिसला बर्‍याच वेळा उशिरा पोहोचता, त्यामुळे आता वेळेवर जा, नाहीतर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बॉसला राग येऊ शकतो. व्यापार्‍यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता दिसत आहे. आरोग्याच्या दृष्टीने बाहेरचे अन्न खाऊ नका, त्यामुळे डी-हायड्रेशन होऊ शकते. अविवाहितांसाठी चांगली स्थळे येऊ शकतात.

धनु (Sagittarius Horoscope) : आपली सौम्य वागणूक आज इतरांवर खोलवर छाप पाडेल. लोकांकडून मदत मिळू शकते, त्यामुळे तुमचे रखडलेले काम देखील पूर्ण होईल. दुसरीकडे, सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. व्यवसाय तोट्यात चालला असेल, तर तो बंद करण्याचा कोणताही मोठा निर्णय न घेता आणखी काही काळ वाट पहावी. फिटनेस राखण्यासाठी, नियमितपणे चालणे किंवा जॉगिंग करणे खूप महत्वाचे आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

मकर (Capricorn Horoscope) : आज तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्रिय असाल, परंतु शारीरिकदृष्ट्या विपरीत परिस्थिती दिसेल. उच्च अधिकारी आणि बॉस कार्यालयातील काम बारकाईने तपासत आहेत, त्यामुळे कामात दुर्लक्ष करू नका आणि काम प्रलंबित न ठेवल्यास चांगले होईल. ज्या व्यापार्‍यांकडे खाण्यापिण्याशी संबंधित किंवा जनरल स्टोअर्स आहेत, त्यांच्यासाठी दिवस लाभदायक असेल. तरुणांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहावे, अन्यथा ते मोठ्या संकटात सापडू शकतात. तिखट-तेलकट आहारामुळे आम्लपित्त आणि बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवू शकतो. मित्रांसोबत गंभीर विषयांवर चर्चा होईल.

कुंभ (Aquarius Horoscope) : आज ग्रहांची चांगली जुळणी तंत्रज्ञानाच्या बाबतीत तुम्हाला अपडेट करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांनी नवीन तंत्रज्ञान, अर्थात संगणक अभ्यासक्रम इत्यादी शिकायचे ठरवले होते, ते आजपासून श्रीगणेश करू शकतात. तुमच्या अधिकृत डेटा सुरक्षेकडे लक्ष द्या, अन्यथा तुमचे महत्त्वाचे दस्तऐवज आणि फाइल्स चुकीच्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. क्रीडा संबंधित उत्पादने विकणाऱ्या व्यापाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून, आज काही जुनाट आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. वैचारिक मतभेदांपासून दूर राहिले पाहिजे.

मीन (Pisces Horoscope) : आजच्या दिवशी भविष्याबद्दल जास्त आशावादी राहणे योग्य नाही, त्यामुळे परिस्थिती समजून घेऊन वर्तमानात जगा. नोकरी व्यवसायाशी निगडित लोकांना कठोर निर्णय घ्यावे लागतील. तसेच, जर त्यांच्या हाताखालील लोक नियमांनुसार काम करत नसतील, तर त्यांची थोडीशी खरडपट्टी काढावी लागेल, म्हणजेच ते शिस्त पाळतील. चैनीच्या वस्तूंच्या व्यापार्‍यांना आज चांगला नफा होताना दिसेल. ज्या लोकांना आरोग्याबाबत अॅलर्जीच्या तक्रारी आहेत, त्यांनी अधिक सतर्क राहावे. आज विशेषतः वैवाहिक जीवनात शांतता राखली पाहिजे. कारण, ग्रहांच्या स्थितीमुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे देखील वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget