एक्स्प्लोर

Horoscope Today 27 February 2025 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 27 February 2025 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 27 February 2025 : आज 27 फेब्रुवारीचा दिवस म्हणजेच गुरुवारचा दिवस आहे. आजचा दिवस दत्तगुरुंना समर्पित आहे. तसेच, आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्वसामान्य असणार आहे. आज तुम्हाला वाहनाचा वापर करताना जरा जपून करावा लागेल. तसेच, संध्याकाळच्या वेळी प्रवास करणं शक्यतो टाळा. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल मात्र तुम्हाला एखादी चिंता सतत सतावेल. त्याचा शोध घेतल्याशिवाय तुम्ही शांत बसणार नाही. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. सामाजिक क्षेत्रात वावरताना तुम्ही आपल्या ध्येयावर ठाम असणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात अनेकजण भागीदार होण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी तुम्हाला या सगळ्या परिस्थितीचा सामना करता आला पाहिजे. तुमच्या आरोग्याबाबत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्ही कोणत्याही विवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. अन्यथा प्रकरण तुमच्यावर बेतू शकतं. त्यामुळे कोणाशीही आपल्या भावना शेअर करु नका. प्रॅक्टिकल विचार करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे.

कर्क रास (Cancer Today Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्नशील असाल. तसेच, सामाजिक कार्यात देखील तुमचा सहभाग पाहायला मिळेल. आज अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. मात्र, आळसपणा टाळणं गरजेचं आहे. 

सिंह रास (Leo Today Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. आज दिवसभर तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता जाणवेल. कारण आजच्या दिवशी कोणी तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करु शकतो. अशा वेळी सावध राहा. तसेच, कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुमची फसलणूक होण्याची शक्यता आहे. 

कन्या रास (Virgo Today Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संयमाचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या व्यवहाराच्या बाबतीत सावधानता बाळगण्याची गरज आहे. तुमच्या बुद्धीचा चांगला विकास होईल. तसेच,आरोग्य देखील चांगलं असणार आहे. 

तूळ रास (Libra Today Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. त्यामुळे तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. आज तुम्ही तुमच्यासाठी किंवा कुटुंबियांसाठी नवीन वस्तूची खरेदी करु शकता. जोडीदाराबरोबर चांगला वेळ जाईल. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope) 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला एखाद्या जुन्या वादविवादापासून सुटका मिळेल. तसेच, आज कोणताही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घ्यावा लागेल. अन्यथा याचे परिणाम तुम्हाला नंतर भोगावे लागतील. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही फार आनंदी असाल.

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज तुमच्या मनात सकारात्मक विचार येतील. तसेच, एखादं नवीन काम सुरु करण्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्ही नवीन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. किंवा एखाद्या योजनेत तुमचे पैसे गुंतवू शकता.  आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्ही निष्काळजीपणा करु नका. वेळेवर डाएट फॉलो करा. 

मकर रास (Capricorn Today Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार झालेला पाहायला मिळेल. तसेच, जर तुम्ही कोणाकडून पैसे उधारी म्हणून घेतले असतील तर ते वेळीच परत करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, भविष्याच्या संदर्भात तुम्ही चांगली योजना आखाल. मात्र, त्यावर काम करणं गरजेचं आहे. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळालेला दिसेल. तसेच, तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, जे लोक बॅंकिंग क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना चांगला लाभ मिळेल. तुमच्या घरी लवकरच शुभ कार्याचं आयोजन केलं जाण्याची शक्यता आहे.

मीन रास (Pisces Today Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा सावधानतेचा असणार आहे. आज कुठेही पैसे खर्च करताना नीट विचारपूर्वक पैसे खर्च करा. अन्यथा महिन्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक चणचण भासू शकते. आज विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळताना दिसणार आहे. तसेच, आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 27 February 2025 : आज 'या' 5 राशींवर दत्तगुरु होतील प्रसन्न; प्रयत्नांना मिळणार यश, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 6PM 12 March 2025Top 100 News : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 12  March 2025 : ABP Majha : 6 PMNitesh Rane News | छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते, राणेंच वक्तव्य; अजितदादांचा सल्ला, राऊत आणि आव्हाड काय म्हणाले?Suresh Dhas Vs Pankaja Munde | पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र; पंकजा, धसांची तक्रार पक्षश्रेष्ठींकडेे करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
Embed widget