एक्स्प्लोर

Horoscope Today 25 March 2024 : आजची धुळवड तुमच्यासाठी ठरणार खास; तर 'या' राशींना होणार ग्रहणाचा त्रास, वाचा 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 25 March 2024 : सर्व 12 राशींच्या लोकांसाठी आजचा धुळवडीचा दिवस खास असणार आहे. परंतु काही राशींना आज ग्रहणामुळे थोड्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. कुणासाठी आजचा दिवस शुभ किंवा कुणासाठी आजचा दिवस अशुभ असेल? पाहा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 25 March 2024 : पंचांगानुसार, आज 25 मार्च 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आज होळीच्या दिवशी काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा देखील येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, नोकरी, स्मार्ट वर्कमुळे तुम्हाला MNC कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते, ती संधी हातून जाऊ देऊ नका. नोकरीत तुमच्या सकारात्मक वृत्तीमुळे तुम्ही प्रत्येक परिस्थिती अनुकूल करण्यात यशस्वी व्हाल.

व्यवसाय (Business) - आज बुधादित्य, वृद्धी योग तयार झाल्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन मार्केटिंगमध्ये गुंतलेल्या व्यावसायिकांसाठीही हा काळ फलदायी ठरेल. कर्जाची परतफेड करताना व्यावसायिकांना काळजी घ्यावी लागेल, जर तुम्ही कर्ज वेळेवर फेडलं तर तुमची प्रतिष्ठाही सुरक्षित राहील.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, विद्यार्थी आज अभ्यासात सर्वोत्तम कामगिरी करू शकतात. तुम्हाला फक्त स्मार्टनेस दाखवून अभ्यासाची गरज आहे. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या, तुम्ही होळीचा सण पूर्ण उत्साहात साजरा कराल. व्यायाम, योगासनं आणि प्राणायामसाठी नियमितपणे वेळ काढणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

वृषभ(Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या जॉब प्रोफाईलमध्ये प्रगती करण्यासाठी प्रसन्न मनाने काम करा, तुम्ही यशस्वी व्हाल.  वैयक्तिक जीवनात आनंदाची शक्यता आहे.

व्यवसाय (Business) - व्यवसायातील नुकसान भरून काढण्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुम्ही तुमचं काम करत राहिल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगलं फळ मिळेल.

विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबतही चांगला वेळ घालवू शकता. विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होतील.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील, तरीही आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कामाच्या ठिकाणी वरिष्ठ लोक तुम्हाला काम समजावून सांगतील. अनुभवी लोकांचा दीर्घकालीन अनुभव तुम्हाला योग्य दिशा दाखवेल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, ग्रहणामुळे तुम्हाला व्यवसायात आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकतं, तुम्हाला व्यवसायात विशेष काही करता येणार नाही. ग्रहांच्या हालचाली लक्षात घेता, व्यवसायात उत्पन्न कमी निघण्याची स्थिती असू शकते. भूतकाळात केलेल्या कोणत्याही चुकीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.

विद्यार्थी (Student) - प्रत्येक असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ नसेल. विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडूंना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहील. प्रवासादरम्यान तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ लवकरच मिळेल. नोकरीत तुमच्या क्षमतेवर तुमचा आत्मविश्वास असायला हवा. तुमच्या कल्पना आणि कौशल्यं तुम्हाला कामाच्या ठिकाणी वर्चस्व राखण्यास मदत करतील.

व्यवसाय (Business) - बुधादित्य, वृद्धी योग तयार झाल्याने व्यवसायातील दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होतील आणि आर्थिक समस्याही दूर होतील. दुपारनंतर तुम्हाला व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. काही अतिरिक्त प्रयत्न करण्याचा हा दिवस आहे.

विद्यार्थी (Student) - तुमच्या मित्रांसोबत एकत्र येऊन तुम्ही जुन्या आठवणी ताज्या करू शकता. स्पर्धात्मक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात जावं लागू शकतं.

आरोग्य (Health) - जर तुम्ही खूप दिवसांपासून मानसिक तणावातून जात असाल तर आज हा ताण कमी होऊ शकतो. मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान आणि योगासना करा.

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, नोकरीत काही बाबींमध्ये बॉसकडून सवलत मिळू शकते. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे, असं म्हणता येईल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, तुमचा व्यवसाय आज वेगळीच उंची गाठेल, आज तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. जेव्हा आपण कोणतेही चांगले काम करतो, तेव्हा त्याचे फायदे मिळू लागतात आणि आपोआपच आपल्याला आत्म-समाधान आणि आत्मविश्वास मिळू लागतो. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळू शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमचं आरोग्य चांगलं राहील. जर तुमचे जुने आजार तुम्हाला त्रास देत असतील तर तपासणी करून घ्या, तुमचा आजार वाढू शकतो.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, नोकरीच्या ठिकाणी काही प्रलंबित कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीसाठी कोणत्याही ठिकाणी अनावश्यक प्रवास सध्या टाळावा.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्या व्यवसायाला नवीन ओळख मिळेल, ज्यामुळे तुमचं बाजारमूल्य वाढेल. व्यवसायात लाभ होईल.

विद्यार्थी (Student) - तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. आज तुम्ही मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन आखू शकता, जिथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खूप मजा कराल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आपल्या आरोग्याबाबत जागरूक रहा, निष्काळजीपणामुळे अडचणी वाढू शकतात.

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणं आवश्यक आहे, तुमच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो. ग्रहण दोष निर्माण झाल्यामुळे नोकरदार लोक ऑफिसमध्ये काम करण्यात थोडा आळस दाखवू शकतात, ते काम करतील परंतु पूर्ण मनाने नाही.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, गुंतवणूकदार तुमच्या व्यवसायात रस दाखवू शकतात, परंतु तुम्ही विचार करूनच भागीदारीत व्यवसाय करावा. व्यावसायिकांना महत्त्वाच्या कामात संघर्ष करावा लागेल, अपेक्षित कामं वेळेवर पूर्ण होतील.

विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यात तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल. होळीच्या सणादरम्यान तुमच्या काही जुन्या आठवणी तुमच्या मनाला त्रास देऊ शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमची तब्येत बिघडू शकते. तब्येत बिघडल्यामुळे तुमचा स्वभाव खूप चिडचिडा होईल, यामुळे तुमचे कुटुंबीय तुमच्यावर रागवतील.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - नोकरीत बढती किंवा बदली होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, परंतु यावेळी तुम्ही तुमचं कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.

व्यवसाय (Business) - बुधादित्य योग आणि वृद्धी योग तयार झाल्यामुळे व्यवसायातील मालमत्तेत वाढ होईल आणि तुम्ही योग्य नियोजन करून प्रत्येक काम करू शकाल. व्यावसायिकांसाठी काळ चांगला ठरणार आहे. आज व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित काही अडकलेले पैसे मिळू शकतात.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, तरच ते यश मिळवू शकतात. 

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. फक्त खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, बुधादित्य, वृद्धी योग तयार झाल्यामुळे तुमचा बॉस तुमच्या कामाने प्रभावित होऊन तुमचा पगार वाढवू शकतो. तुमच्या कामात तुम्हाला मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या व्यवसाय आज चांगला चालेल, ज्यामुळे तुमची कमाई वाढेल. तुमच्यासाठी हा जुन्या गोष्टी सोडून व्यवसायात पुढे जाण्याचा दिवस आहे. ग्रहांचा खेळ पाहता व्यावसायिकांनी फायदेशीर व्यवहारांकडे अधिक लक्ष द्यावं.

विद्यार्थी (Student) - तुम्ही अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे. नवीन पिढीला नकारात्मक गोष्टींपासून दूर राहावं लागेल, त्यांचे मन त्यांना भविष्यात नुकसान होईल अशा गोष्टी करायला सांगेल. उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे, तुम्हाला एखाद्या चांगल्या महाविद्यालयातून ऑफर मिळू शकते.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम मोडू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, नोकरदार लोकांनी नशिबावर अवलंबून राहू नये आणि नोकरीसाठी प्रयत्न करत राहावे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते, ज्यातून त्याला काहीतरी नवीन शिकायला मिळेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, गुंतवणूकदारांनी व्यवसायात केलेली गुंतवणूक त्यांना भरघोस नफा मिळवून देईल, ज्यामुळे जुनं नुकसान भरून काढलं जाईल.

विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुमच्या मुलांना फोन आणि इंटरनेटवर जास्त सक्रिय होऊ देऊ नका, त्यांना खेळांशी ओळख करून द्या आणि त्यांना शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करा.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आज तुम्हाला डोकेदुखीसारखी समस्या त्रास देऊ शकते. आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, कामावर अनावश्यक कामांमध्ये आपला वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. नोकरीत कोणत्याही कागदावर सही करण्यापूर्वी सर्व कायदेशीर कागदपत्रं काळजीपूर्वक वाचा.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यवसायात काही मोठा खर्च होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या पैशाचा ओघ कमी होईल. तुमचं मन क्लियर असेल तेव्हाच तुम्ही व्यवसायात ध्येय गाठू शकाल.

कौटुंबिक (Family) - तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी दिवस खूप महत्त्वाचा असेल, कारण कुटुंबात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. ग्रहदोष निर्माण झाल्यामुळे तुमची कामं बिघडतील. तुमच्या फ्रेंड सर्कलमधील कोणाशी तरी तुमचे वाद होऊ शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्या.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, तुमच्या नोकरीसोबत अतिरिक्त उत्पन्नासाठी तुम्ही पार्ट टाईम जॉब किंवा ऑनलाईन फ्रीलान्सिंग करू शकाल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ होईल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल, तुमची आज चांगला कमाई होईल. सणामुळे आज तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, आज तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही खूप मज्जा कराल, परंतु यासोबत अभ्यासावरही लक्ष द्यावं

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यान करावा आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Holi 2024 : आला होळीचा सण लय भारी! तुमच्या राशीनुसार 'या' रंगांनी खेळा होळी, नांदेल सुख-समृद्धी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?

व्हिडीओ

BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Rane vs Rane : मालवणमध्ये 10 जागांवर शिवसेनेचा मोठा विजय Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
IND vs PAK U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी अखेर पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला मुरगूडला धक्का; सतेज पाटलांचं शिरोळ हातकणंगलेत बेरजेचं राजकारण जमलं
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला कागलात यश, मुरगूडला धक्का
Embed widget