Horoscope Today 25 August 2025: आजचा सोमवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! भाद्रपदच्या सुरूवातीलाच धनलाभाचे योग, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 25 August 2025: आजचा सोमवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 25 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 25 ऑगस्ट 2025, आजचा वार सोमवार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आजचा दिवस खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज महिलांचा मूड आनंदी राहील, लोकांमध्ये मिळून मिसळून राहाल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज कोणत्याही कामासाठी जास्त कष्ट घेतल्याशिवाय यश मिळणार नाही
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज कर्ज हवे असणाऱ्यांना त्याची तरतूद करता येईल, परंतु अंथरूण पाहून पाय पसरलेले चांगले पडेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज एखादी घटना अचानक घडण्याकडे परिस्थितीचा कल राहील, अशा चांगल्या वाईट घटना जास्त मनावर घेतल्या तर मनावरचा ताण वाढेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज परदेश गमनाच्या संधी मिळू शकतात, बौद्धिक आणि वैचारिक पात्रता वाढेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज महिलांच्या नवीन योजनांचे स्वागत होईल, एखाद्याशी पटकन ओळख करून घ्याल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज घरात घराबाहेर कुठेही आपल्या बोलण्याने सर्वांना आपलेसे कराल आणि माणसे जोडाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात प्रचंड धाडसाने विरोधकांचा सामना कराल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज ज्यांना नवीन नोकरी शोधायची आहे, त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज खूप दिवसानंतर आर्थिक परिस्थिती सुधारेल, पैसा मिळण्याचे अनेक मार्ग खुले होतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज पूर्वी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल, फक्त कष्ट मात्र जबरदस्त करावी लागणार आहेत
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज एखाद्या गोष्टीतील यशाची ताबडतोब अपेक्षा करणे चुकीचे ठरेल, नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.
हेही वाचा :
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींचं भाग्य घेऊन आलेत, पॉवरफुल धनयोग बनतोय! नोकरीत पगारवाढ, उत्पन्न वाढेल..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















