Horoscope Today 18 September 2025: आज गुरूवारी 'या' 6 राशींवर होणार दत्तकृपा! भाग्य उजळवणारा दिवस, 12 राशींचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 18 September 2025: आजचा गुरूवारी 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 18 September 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 18 सप्टेंबर 2025, आजचा वार गुरूवार आहे. आजचा दिवस हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज जुनी आणि वसूल होतील, यासाठी मित्र मंडळींचे सहकार्य उत्तम मिळेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज घरातील व्यक्तीकडून फार अपेक्षा न ठेवल्यास स्वास्थ मिळेल, काही लाभदायक आर्थिक योजनांचा पाठपुरावा करा
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये कामाचा ताण वाढला तरी, त्यातील शॉर्टकट शोधून काम सोपे कराल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज घरातील लांबलेल्या कामांकडे लक्ष द्यावे, तरुणांना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज कलाकार खेळाडूंना एखादी पर्वणी डोळ्यासमोर येईल, घरातील प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी वातावरण लाभेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज तुमच्या नवीन योजनांचे व्यवसाय स्वागत होईल, त्यामुळे मान मरातब आपोआप घर चालत येईल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज जोडीदाराचे सहकार्य सर्व बाबतीत चांगले मिळेल, महिला छंद जोपासतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज ज्या समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी तर्कशब्द विचारांचा मागोवा घ्यायला लागेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज आपले अंदाज आडाखे नेहमीच बरोबर असतात असे नाही, त्यांना पारखून घ्यावे लागेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज घरातील लोकांना तुमचे विचार योग्य तऱ्हेने पटवून द्याल, नोकरीमध्ये कंटाळवाणे काम करावे लागेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज एखादा मोठा आर्थिक फटका बसणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो पैशाशिवाय जास्त विचार कराल, कोणत्या कामाला महत्त्व द्यायचं हे ठरवावे लागेल.
हेही वाचा :
आजपासून 'या' 3 राशींचं टेन्शन संपलं समजा! शनि-बुध आमने सामने येणार, जबरदस्त प्रतियुती योग बक्कळ पैसा देईल..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















