एक्स्प्लोर

Horoscope Today 17 February 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशींवर आज बाप्पांची कृपा! करिअर, आर्थिक स्थिती कशी? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 17 February 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 17 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 17 फेब्रुवारी 2024, शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....

तूळ (Libra Horoscope Tula Rashi Today)

आज तुमचा दिवस सन्मानाचा असेल. तुम्ही नवीन नोकरीला लागला असाल तर तिथे व्यवस्थित काम करा, काम अपूर्ण ठेऊ नका. व्यावसायिकांना त्यांच्या कामाबरोबरच सामाजिक कार्यातही योगदान दिल्याने त्यांचा मान-सन्मान वाढेल. विद्यार्थी ज्या विषयात कमी पडतात, त्या विषयाची शिकवणी लाऊ शकतात. आज तुमच्या जोडीदारासोबत काही छोट्या गोष्टीवरून तुमचा मोठा वाद होऊ शकतो. आज तुम्ही विश्वासू लोकांसोबतच राहा. आज तुमच्या पालकांच्या तब्येतीची काळजी घ्या, पोटाशी संबंधित समस्येमुळे ते त्रस्त असू शकतात.  

वृश्चिक (Scorpio Horoscope Vruschik Rashi Today)

तुमचा आजचा दिवस साधारण असेल. जे लोक टार्गेट बेसवर काम करतात त्यांनी त्यांचं टार्गेट वेळेत पूर्ण करण्यावर जास्त भर दिला पाहिजे, तरच त्यांचा पगार वाढू शकेल. व्यापारी वर्गाने रागाच्या भरात कोणतंही चुकीचं काम करू नये, धूर्त आणि हुशार लोक लोभ दाखवून तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. विद्यार्थ्यांनी शाळेत शिस्त मोडल्यास त्यांना शाळेकडून कठोर शिक्षा होऊ शकते. महिलांबद्दल बोलायचं तर, आज स्त्रिया आपलं फ्रेंड सर्कल थोडं वाढवू शकतात. आज रस्ता ओलांडताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊ शकतो.

धनु (Sagittarius Horoscope Dhanu Rashi Today)

तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. ऑफिसमध्ये काम करताना वेळेचं भान ठेवू नका, घरी परतण्याची घाई केल्यास वरिष्ठांच्या नाराजीला सामोरं जावं लागू शकतं. आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस नसेल तर त्यांनी सकाळी लवकर उठून देवाची पूजा करावी आणि आपल्या दिनचर्येत बदल करावा. आज तुम्ही तुमच्या मुलाच्या वागणुकीबद्दल थोडेसे चिंतेत असाल, तुमच्या मुलाचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला किरकोळ दुखापत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Guru Gochar 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू करणार वृषभ राशीत प्रवेश; 'या' राशींची अडकलेली कामं होणार पूर्ण, धनलाभाचेही योग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaParbhani Violence : परभणीमधील जाळपोळ - तोडफोडीत छोट्या व्यापाऱ्यांना फटकाPune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्तीABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Embed widget