Horoscope Today 16 September 2025: आजचा मंगळवार 'या' 7 राशींचं भाग्य उजळवणारा! श्रीगणेश करतील रक्षण, 12 राशींचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 16 September 2025: आजचा मंगळवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 12 September 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 16 सप्टेंबर 2025, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज उदार वृत्तीमुळे ओळखी जास्त होतील, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या तालावर नाचावे लागेल, काम केल्यामुळे त्यांची मर्जी राहील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज प्रेमी जणांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी राहाल, विवाह करायचा आहे त्यांचे विवाह जमतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज तरुण अतिशय आधुनिक बनतील, त्यामुळे मोठ्या लोकांशी पटणार नाही, महिला कलेच्या क्षेत्रात रमतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज वर्तमान काळाबरोबरच भूतकाळ ही महत्त्वाचा वाटेल, तुमचे विचार जगाच्या ही पुढे धावतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज मॅनेजमेंट शाखेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद घेता येईल, मागचा अनुभव गाठीच धरून पुढील वाटचाल कराल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज व्यवसाय मध्ये नशिबाची साथ कमी मिळाली तरी, चिकाटीचा अवलंब करून काम पूर्ण कराल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्या आमच्या गुणांची कदर केली जाणार नाही, त्यामुळे निराशा पदरी येईल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आजूबाजूचे वातावरण पूरक नसल्यामुळे काम करण्याचा उत्साह यथा तथाच राहील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज लवकर निराश व्हाल, कुटुंबातील दोन पिढ्यातील अंतर जाणवल्याशिवाय राहणार नाही
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज वैचारिक तफावत निर्माण झाल्यामुळे ताण तणाव निर्माण होतील, घरातील मोठ्या माणसांचे आरोग्य सांभाळात
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात सांसारिक कटकटीला सामोरे जावे लागेल, परंतु तुमच्या भावनांवर तुमचे पक्के नियंत्रण राहील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो व्यवसाय नोकरीमध्ये नवीन कल्पना प्रत्यक्ष उतरवाल, या धाडसी कल्पनांचे चांगले वाईट प्रतिसादही मिळतील.
हेही वाचा :
Weekly Lucky Zodiac Sign: पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींचे नशीब पालटणारे! जबरदस्त बुधादित्य राजयोग बनतोय, इच्छा पूर्ण होणार, बक्कळ पैसा हाती
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















