Horoscope Today 16 June 2025: आजचा सोमवार 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! भगवान शंकराच्या कृपेने इच्छा होणार पूर्ण, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 16 June 2025: आज सोमवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 15 June 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 16 जून 2025, आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज पैशाचा अति लोभ संकटात पाडेल. कष्ट टाळून पटकन श्रीमंत होण्याचा मार्ग अवलंबू नये.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज भावंडांचे सहकार्य मिळेल परंतु त्यांच्या अवास्तव मागण्यांचा ही विचार करावा लागेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज महिलांचा विसरभोळेपणा वाढेल, त्यांचा व्यवसाय नोकरी बोलण्याशी संबंधित आहे त्यांना अनेक संधी चालून येतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल, नवनवीन कल्पना जन्म घेतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी आकाशाला गवसणी घालण्याचे देत आखाल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो समस्या या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवलात तर अडचणी सहज मागे टाकून द्याल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज यशस्वी होण्याकडे वाटचाल करावी, तुमच्या कल्पना इतरांना थोड्या चाकोरी बाहेरच्या वाटल्या, तरी सर्वजण तुमच्याशी सहमत होतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात गुप्त शत्रूंना तोंड द्यावे लागेल, महिला स्वतःच्या मनाप्रमाणे वागतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज प्रेम प्रकरणांमध्ये काही धाडसी योजना असतील, तर शिस्त आणि कर्तव्याच्या चौकटीत राहून सर्व निर्णय घ्यावे लागतील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज थोडा भावनांचा कोंडमारा होण्याची शक्यता, परंतु कष्ट साध्य यश मिळणार आहे हे नक्की
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज सौख्याचे आनंदाचे क्षण तुम्हाला शोधत येतील आणि सुखद धक्के बसतील भाग्याची साथ चांगली मिळेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज नवीन कामांना उजाळा मिळेल, अचानक नोकरी बदल कामात बदलही संभवतो
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज संततीबाबत एखादी अचानक बातमी कानावर येऊन अचंबित व्हाल
हेही वाचा :
Shani Vakri 2025: जुलै ते नोव्हेंबर 'या' 3 राशींच्या पाठीशी शनिदेवांचा आशीर्वाद! वक्री चाल, करणार मालामाल, श्रीमंत व्हायला वेळ लागणार नाही
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















