Horoscope Today 15 October 2025: आजचा बुधवार 'या' 4 राशींसाठी भाग्यशाली! श्रीविठ्ठलाच्या कृपेने अडचणी होतील दूर, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 15 October 2025: आजचा बुधवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 15 October 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 15 ऑक्टोबर 2025, आजचा वार बुधवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीविठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज खूप काही कामाचे नियोजन केले तरी सर्व गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, आकर्षक बोलण्यामुळे लोकांच्या पोटात शिरून काम करून घ्याल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल, उत्कृष्ट कल्पनाशक्तीच्या जोरावर जनमानसात प्रभाव पडेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल, पुढील गोष्टींची अंत स्फूर्ती जाणवेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज तुमच्या कर्तुत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील, महिलांमधील स्त्री सुलभ कोमलता आणि प्रेमळपणा जास्त जाणवेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज कामाची उत्तम अंमलबजावणी करण्यात तुमचा हात कोणी धरणार नाही
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज मुत्सद्दीगिरीच्या क्षेत्रात यशस्वी व्हाल, परंतु ज्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळायला हवा तो न मिळाल्यामुळे थोडे नाराज व्हाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जेवढा सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल, तेवढी कामाची गती वाढवू शकाल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज समस्या या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा, तुमच्या एखाद्या निर्णयाला कुटुंबाचा विरोध होऊ शकतो
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज जनमानसात आपला चांगला ठसा उमटवाल, अहंकार दुखावला गेल्यास अत्यंत अस्वस्थ व्हाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज तुम्ही करत असलेल्या मंत्राची उपासना प्रबळ इच्छाशक्ती निर्माण करेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज मानसिक ताकद वाढेल, आर्थिक अडचण दूर झाल्यामुळे हात उसने घेतलेले पैसे देऊन टाकाल.
हेही वाचा :
2026 Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनी सज्ज व्हा! दिवाळीपासून ते संपूर्ण 2026 वर्ष नशीब पालटणारं, नवीन मोठे बदल घडणार..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















