Horoscope Today 15 October 2024 : आज सर्व राशींवर राहणार बाप्पाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 15 October 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 15 October 2024 : पंचांगानुसार, आज 15 ऑक्टोबर 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
तुम्ही आतल्या गाठीचे आहात असा शिक्का तुमच्यावर पडण्याची शक्यता आहे.
वृषभ (Taurus Horoscope Today)
वैवाहिक जीवनात गैरसमजचे जाळे पसरेल आणि कळत नकळत त्यात गुंतत जाल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
आज स्वतःशी प्रामाणिक राहण्यातच शहाणपणा आहे, हे समजून घेतलं तर काम फत्ते होईल.
कर्क (Cancer Horoscope Today)
आज जोडीदाराशी चांगले सूर जुळतील. आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या मार्गावर राहील.
सिंह (Leo Horoscope Today)
आज तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांबाबत जागरूक राहाल.
कन्या (Virgo Horoscope Today)
कामासाठी परदेश गमनाच्या संधी मिळतील. तीर्थक्षेत्र यात्रा करण्याचे संकल्प कराल.
तूळ (Libra Horoscope Today)
विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. महिला रसिक बनतील.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
तुमच्या जवळच्या माणसांच्या मनात तुमच्याबद्दल सुप्त आदर असण्याची भावना तुम्हाला जाणवेल.
धनु (Sagittarius Horoscope Today)
अगदी जवळच्या मित्राच्या बाबतीत चांगले वाईट अनुभव येतील. अतिभावना प्रधानता नको.
मकर (Capricorn Horoscope Today)
आज कर्तव्याला जास्त महत्त्व द्याल. जोडीदाराने मांडलेले प्रस्ताव फार उशिरा पडताळून पाहिल्यामुळे ताण जाणवेल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
एखाद्या गोष्टीवर वेळीच विचार केला नाहीत तर संघर्षाची ठिणगी पडेल.
मीन (Pisces Horoscope Today)
सुखाच्या तुमच्या कल्पना इतरांपेक्षा वेगळा राहिल्यामुळे नात्यांमधील दुरावा निर्माण होऊ शकतो.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: