Shani Margi 2024 : शनीची सरळ चाल 'या' 3 राशींवर पडणार भारी; नोव्हेंबरपासून सर्वच कामं खोळंबणार, आर्थिक अडचणी वाढणार
Shani Margi 2024 : न्याय देवता शनि सध्या वक्री स्थितीत आहे. 15 नोव्हेंबरपासून स्वत:च्याच राशीत शनि सरळ चाल चालेल. शनि सरळ चालीत असल्यामुळे काही राशीच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत.
Shani Margi 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, माणसांच्या जीवनावर शनीच्या स्थितीचा मोठा परिणाम होतो. शनि (Saturn) कधी वक्री असतो, तर कधी सरळ चालीत असतो, ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. कर्माचे फळ देणारा शनि जूनमध्ये वक्री झाला आहे, जो आता थेट दिवाळीनंतर सरळ चाल चालेल. शनि 15 नोव्हेंबरला मार्गी (Shani Margi 2024) होत सरळ चाल चालेल. शनीच्या या स्थितीचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांची उलटी गिनती आता सुरू होईल, त्यांचं जीवन अडचणींनी भरलेलं असेल. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी शनीची सरळ चाल धोक्याची सिद्ध होईल. शनि मार्गी झाल्यावर त्याचा परिणाम तुमची संपत्ती, सासरचे संबंध आणि तुमच्या आर्थिक स्थितीवर दिसेल. या काळात तुम्हाला तुमच्या जीवनात काही गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कर्क राशीच्या लोकांचं मानसिक आरोग्य ढासळू शकतं. तुम्हाला स्वतःला मानसिकदृष्ट्या सांभाळावं लागेल. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, पण तुमच्या कार्यालयात तुमच्या कामाचं खूप कौतुक होईल. घरात शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी शनि मार्गी हानीकारक ठरू शकतो. नोव्हेंबर महिन्यात तुमच्या खर्चात अनावश्यक वाढ होऊ शकते, ज्याचा पुढे गुंतवणुकीवरही परिणाम होईल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही बदल घडतील. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सासरच्या मंडळींमुळे पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात. तुमचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी तुम्हाला एकमेकांना समजून घेणं आवश्यक आहे.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांना शनीच्या सरळ चालीचा फटका बसेल. शनि प्रत्यक्ष असल्यामुळे त्यांच्या जीवनात समस्या वाढू शकतात. तुमच्या कामाच्या ठिकाणी गोष्टी बिघडतील आणि तुम्हाला सुन्न करतील. तुम्ही मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ होऊ शकता. कठोर परिश्रम करूनच जीवनात यश मिळेल. या काळात तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani 2024 : शनीचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; मेषसह 'या' 5 राशींचे होणार हाल, कोसळणार अडचणींचा डोंगर
Saturday Remedies : फक्त एका शनिवारी करा 'हा' उपाय; सोन्यासारखं उजळेल नशीब, शनि दोष होईल दूर