Horoscope Today 14 October 2025: आजचा मंगळवार 'या' 7 राशींसाठी भाग्यशाली! बाप्पाची कृपेने लवकरच इच्छा पूर्ण होणार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 14 October 2025: आजचा मंगळवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 14 October 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 14 ऑक्टोबर 2025, आजचा वार मंगळवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. बाप्पांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज तुमचा मूड कधी जाईल आणि कधी चिडाल याचा भरवसा राहणार नाही. मुलांच्या भन्नाट कल्पनांमुळे चक्राहून जाल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज स्वतःचा भूतकाळ आठवल्यामुळे थोडे क्रोधागारात जाल, कुटुंबातील नातेवाईकांच्या वागण्यामुळे त्रस्त व्हाल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज तुमच्या बोलण्यामध्ये एक वाक्यात न राहिल्यामुळे जवळचे लोक गोंधळून जातील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज दिलेल्या शब्द जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न करावा, व्यवसायात कामाचे पैसे मिळण्यासाठी थोडा संघर्ष करावा लागेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज भावनांशी न पटल्यामुळे ताण-तणाव वाढतील, कामामध्ये नाकापेक्षा मोती जड होता उपयोगाचा नाही
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज महिला क्षुल्लक कारणावरून चिडचिड करतील. पैसा मिळवण्याचे अनेक पर्याय डोळ्यासमोर असतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्यातील जिद्द कामाची शिस्त आणि धडाडी आज वाखाणण्याजोगी असेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आज उत्तम नियोजन कराल, मानापमानाच्या कल्पना जरा टोकदार होतील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज स्वतःहून कोणाकडेही कसलीही याचना करणार नाही, कुटुंबामध्ये आनंदी वातावरण ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज तापलेल्या वातावरणात पाण्याचा शिडकावा देऊन परिस्थिती काबूत ठेवण्यासाठी यशाला खेचून आणाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज कडक बोलणे टाळले तर बरेच काही साधून जाल, घरातील धार्मिक कार्यात भाग घ्यावा लागेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजण्यात धन्यता मानाल. परंतु वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल.
हेही वाचा :
Lakshmi Pujan 2025: यंदाचं लक्ष्मीपूजन 20 की 21 ऑक्टोबरला होणार? अमावस्येच्या तिथीबाबत संभ्रम, ज्योतिषींची महत्त्वाची माहिती
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















