Lakshmi Pujan 2025: यंदाचं लक्ष्मीपूजन 20 की 21 ऑक्टोबरला होणार? अमावस्येच्या तिथीबाबत संभ्रम, ज्योतिषींची महत्त्वाची माहिती
Lakshmi Pujan 2025: ज्योतिषींनी सांगितले की, दिवाळीच्या 20 आणि 21 ऑक्टोबर दोन्ही दिवशी येणाऱ्या अमावस्या तिथीमध्ये अनिश्चितता आहे, त्यामुळे लक्ष्मीपूजन नेमकं कधी करावं? याबाबत संभ्रम आहे.

Lakshmi Pujan 2025: दिवाळीचा (Diwali 2025) सण अवघ्या काही दिवसांवर आहे. अशात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे, जो दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवितो. यंदा दिवाळी साजरी करण्याच्या योग्य तारखेबद्दल काही गोंधळ आहेत. नुमरोवाणी येथील ज्योतिषी सिद्धार्थ एस कुमार यांनी सांगितले की, 20 आणि 21 ऑक्टोबर दोन्ही दिवशी येणाऱ्या अमावस्या तिथीमध्ये अनिश्चितता आहे, त्यामुळे लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan 2025) नेमकं कधी करावं? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. जाणून घ्या सविस्तर...
दिवाळीत अमावस्येचे मोठे महत्त्व, तिथीवरून गोंधळ.. (Lakshmi Pujan 2025 Exact Date)
दिवाळी, ज्याला दिव्यांचा उत्सव म्हणूनही ओळखले जाते, हा भारतीय संस्कृतीतील एक प्रमुख सण आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विशेष महत्त्वाची आहे. दिवाळी अमावस्येला येते, जेव्हा आकाशात चंद्र दिसत नाही आणि अंधार असतो. या अंधारात घरांमध्ये दिवे लावणे हे लक्ष्मी देवीचे स्वागत करण्याचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीला प्रकाशाचे प्रतीक मानले जाते आणि रात्री दिवे लावणे हे दर्शवते की आपण आपल्या जीवनातील अज्ञान आणि अंधार दूर करत आहोत आणि ज्ञान, समृद्धी आणि प्रकाशाला आमंत्रित करत आहोत. मात्र यंदा 20 आणि 21 ऑक्टोबर दोन्ही दिवशी येणाऱ्या अमावस्या तिथीमध्ये अनिश्चितता आहे, जाणून घ्या...
यंदाचं लक्ष्मीपूजन 20 की 21 ऑक्टोबरला होणार?
- ज्योतिषशास्त्रानुसार यंदा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचे शुभ मुहूर्त मंगळवार, 21 ऑक्टोबरलाच आहे, असे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल नागेश वैद्य यांनी स्पष्ट केले.
- 20 ऑक्टोबरला चतुर्दशी तिथी दुपारी 3 वाजून 44 मिनिटांनी संपून अमावस्या सुरू होते.
- त्या दिवशी प्रदोषकाळात अमावास्येची अधिक व्याप्ती असल्याने तो दिवस लक्ष्मीपूजनासाठी योग्य मानला जात नाही.
- 21 ऑक्टोबरला अमावास्या प्रदोषकाळात अल्पकाळ असली तरी शास्त्रानुसार त्या काळात पूजन करणे अधिक फलदायी ठरते.
- धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथीनिर्णय आणि व्रतपर्वविवेक या ग्रंथांतील वचनांचा संदर्भ देत डॉ. वैद्य यांनी सांगितले की,
- अमावास्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असलेल्या दिवशी पूजन केल्यास लक्ष्मी स्थिर राहते.
हेही वाचा :
Navpancham Rajyog 2025: 14 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींची दिवाळी जोरात! पॉवरफुल नवपंचम राजयोगामुळे कुबेराचा धनवर्षाव, तिजोरी भरणार
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















