एक्स्प्लोर

Horoscope Today 14 July 2023 : मिथुन, कन्यासह 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 14 July 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 14 July 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या हालचालीनुसार, वृषभ राशीचे लोक आज आपल्या प्रियकरासह बाहेर फिरायला जाऊ शकतात, वृश्चिक राशीच्या लोकांच्या कामगिरीचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळू शकतात. मेष ते मीन राशीसाठी आजचा शुक्रवारचा दिवस कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुम्ही व्यवसाय करत असाल तर आज कोणतीही रिस्क घेऊ नका. व्यवसायात नुकसान होऊ शकते. तुम्ही कोणतेही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर या योजनेबद्दल कोणालाही सांगू नका, अन्यथा तुमचे काम पूर्ण होणार नाही. कोणत्याही कार्यक्षेत्रात जोखीम घेणे टाळा. आज तुमच्या कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. घरातील सर्व लोकांमध्ये एकोपा ठेवा. तुमची प्रकृती थोडीशी बिघडू शकते, तब्येतीची काळजी घ्या आणि संतुलित आहार घ्या. आज तुम्ही काही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. तुमची मानसिक स्थितीही चांगली असणार आहे.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या घरात एखाद्या गोष्टीवरून मोठा वाद होऊ शकतो. आज तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल खूप चिंतेत असेल. समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. इतरांना दोष देऊ नका. जर तुम्ही बराच काळ आजारी असाल, तर तुम्हाला तुमच्या तब्येतीची चिंता सतावत राहील. चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घ्या. एखादे नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यात अडचणी येऊ शकतात. कोणत्याही क्षेत्रात जास्त पैसा खर्च करणे टाळा. जर तुम्ही एखाद्या कामाची तयारी करत असाल तर ते काम पुढे ढकला. तुम्ही काही धार्मिक कार्य देखील करू शकता. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊनच काही काम करा.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. आज तुमचे मन खूप प्रसन्न राहील. तुमचे काही रखडलेले मोठे काम पूर्ण होईल. आजचा दिवस व्यावसायिक लोकांसाठी खूप शुभ दिवस आहे.  तुम्ही तुमच्या व्यवसायात मोठा बदल करू शकता किंवा तुम्ही दुसरा नवीन व्यवसाय देखील सुरु करू शकता. तुम्हाला तुमच्या कुटुंबात एखाद्या गोष्टीबद्दल खूप आदर मिळेल. मानसिक संतुलन वाढेल. प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या लोकांना आज नवी जबाबदारी मिळेल, जी तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल. तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर एखाद्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कौटुंबिक व्यवसाय सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे. वडीलही तुमच्या व्यवसायात काही पैसे खर्च करतील, इतर सदस्यही तुम्हाला तो यशस्वी करण्यासाठी मदत करतील. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. अधिकाऱ्यांना बढतीची संधीही मिळेल. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची योजना कराल, जिथे सर्वजण खूप आनंदी दिसतील.

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. आज व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्यानंतर व्यावसायिक वर्ग खूप आनंदी होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीतही प्रगतीच्या संधी मिळतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. बँकेशी संबंधित व्यवहारात अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आजचा दिवस करमणूक करण्यासाठी चांगला आहे, त्यामुळे तुमच्या आवडत्या गोष्टी करा आणि कामाचा आनंद घ्या. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तळलेल्या पदार्थांपासून दूर राहा आणि नियमित व्यायाम करत राहा. काही लोकांसाठी, कुटुंबात नवीन व्यक्तीचे आगमन उत्सव आणि आनंदाचे क्षण घेऊन येईल. इतरांच्या हस्तक्षेपामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमचा संवाद आणि काम करण्याची क्षमता प्रभावी ठरेल. तुमच्या जोडीदारामुळे तुमची प्रतिष्ठा थोडी दुखावली जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. पदवीधरांसाठी चांगले संबंध येतील. जे लोक व्यवसाय करत आहेत, ते रखडलेल्या व्यवसाय योजना पुन्हा सुरू करू शकतील. तुम्हाला व्यवसायाशी संबंधित सहलींवर जाण्याची संधी देखील मिळेल, जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल. जमिनीत गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. 

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारेल. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन पद्धतींचा अवलंब करून यश मिळवतील. तुम्हाला मित्रांद्वारे नवीन संपर्क देखील मिळतील, ज्यामुळे तुमचे उत्पन्न देखील वाढेल. दीर्घकालीन नफ्याच्या दृष्टिकोनातून स्टॉप आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांना परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. पालकांचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही विशेष खास असणार नाही. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. ध्यान केल्याने तुम्हाला शांतीही मिळेल. तुमचा पैसा कुठे खर्च होतोय यावर लक्ष ठेवा, अन्यथा तुम्हाला भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद संपवून तुम्ही तुमचा उद्देश सहज पूर्ण करू शकता. तुमचं मन व्यक्त केल्याने तुम्हाला खूप हलके वाटेल. आज तुमच्या वाईट सवयी उद्या तुम्हाला भारी पडू शकतात. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळण्याची चिन्हे आहेत. मित्रांचे सहकार्य मिळेल.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. अविवाहित लोकांचे संबंध पुढे जाऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे सर्वजण खूप आनंदी दिसतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. मित्रांसोबत कुठेतरी फिरण्याचाही बेत होईल. जर तुम्हाला पुरेशी विश्रांती मिळत नसेल, तर तुम्हाला खूप थकवा जाणवेल यासाठी तुम्ही विश्रांती घेणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यांच्यासोबत राहता ते तुमच्या निष्काळजी आणि अनियमित वर्तनामुळे नाराज होऊ शकतात. प्रेमाच्या बाबतीत आज तुमचा गैरसमज होऊ शकतो. प्रवास आणि शिक्षणाशी संबंधित काम तुमची जागरूकता वाढवेल. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराच्या आरोग्याकडे योग्य लक्ष आणि काळजी घेणे आवश्यक आहे. आज तुमची आर्थिक बाजू चांगली असेल, पण त्याचवेळी तुम्ही तुमचे पैसे व्यर्थ खर्च करू नयेत हेही लक्षात ठेवा. आज स्वतःसाठी वेळ काढून तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कुठेतरी फिरायला जाऊ शकता. मात्र, या काळात कुठेतरी फिरत असताना तुमच्या दोघांमध्ये खूप भांडण होऊ शकते. हा दिवस तुम्हाला तुमच्या जोडीदाराची उत्तम बाजू दाखवणारा आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी कठोर परिश्रम करतील, त्यात त्यांना यश मिळेल. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या पालकांसोबत घालवा. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची योजना करा, जिथे सर्वजण खूप आनंदी दिसतील. 

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. आज तुम्हाला तुमच्या कामात कुटुंबाचं सहकार्य मिळेल. आज तुमचे मित्र-मैत्रीण देखील तुम्हाला भेटू शकतात. त्यांच्याबरोबर आनंदाचे क्षण घालवा. आज तुम्हाला जमीन, रिअल इस्टेट किंवा सांस्कृतिक प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पूर्ण करेल. छोटे व्यापारी आज आपल्या कर्मचाऱ्यांना खुश करू शकतात. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील आणि तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. भावाच्या लग्नात येणारे अडथळे दूर होतील. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. तुमच्या मुलांद्वारे तुम्हाला सन्मान मिळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला आज जो मोकळा वेळ मिळेल त्याचा तुम्ही पुरेपूर आनंद घ्या. जर तुम्ही तुमच्या घरगुती जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर काही लोक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती असेल. तुमच्या मनात काही गोष्टी साचून राहिल्या असतील तर तुम्ही त्या तुमच्या वडिलांबरोबर देखील शेअर करू शकता. जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील. राजकारणात यश मिळेल. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होईल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 13 July 2023 : वृषभ, तूळसह 'या' राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक लाभाची संधी; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
Embed widget