एक्स्प्लोर

Horoscope Today 13 June 2024 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? तुमचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 13 June 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 13 June 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या. 

मेष रास (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, नोकरदार लोकांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. थोडे अधिक परिश्रम करून सामाजिक आणि राजकीय पातळीवर तुम्हाला यश मिळवता येईल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, टीमवर्कमुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल, ज्यामुळे तुम्ही जुन्या नुकसानाची भरपाई पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिकांनी आज काही आव्हानांसाठी स्वतःला तयार ठेवलं पाहिजे. कारण बाजारातील चढ-उतार तुम्हाला एकाच वेळी भारी पडू शकतात.

विद्यार्थी (Student) - लेखनाची आवड असलेल्या तरुणांना वाचन आणि लेखनात स्पर्धात्मकता वाढवावी लागेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात तुमचे सकारात्मक विचार नातेसंबंधात गोडवा आणतील. कौटुंबिक दृष्टीकोनातून दिवस चांगला जाणार आहे, संध्याकाळी सर्वजण एकत्र बसून चर्चा कराल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांना सामोरं जावं लागेल.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, कामातील तांत्रिक अडचणींमुळे तुम्ही तुमचं काम वेळेवर पूर्ण करू शकणार नाही.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, भागीदारीत व्यवसाय सुरू करताना तुम्हाला काही अडथळ्यांना सामोरं जावं लागेल, परंतु हार मानू नका आणि आपले प्रयत्न सुरू ठेवा.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थी अभ्यासात काहीतरी नवीन शिकतील, ज्याचा त्यांना भविष्यात खूप उपयोग होईल. कुटुंबातील काही लोकांच्या कृतीमुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही ते तुमच्याशी भांडू शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. तुमचा नाविन्यपूर्ण विचार तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आज विरोधक तुमची तक्रार करण्याची संधीच शोधतील. 

व्यवसाय (Business) - व्याघ्र योग तयार झाल्याने व्यवसायात लक्ष केंद्रित केल्यास नक्कीच यश मिळेल. व्यावसायिकांनी आपल्या कामाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून व्यवसायात येणाऱ्या आर्थिक समस्यांशी तुम्ही लढू शकाल.

विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल बोलताना, विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल, तरच ते त्यांचे ध्येय साध्य करू शकतील. मित्रांसोबत तुम्ही गरजू लोकांना मदत करताना दिसाल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.

कर्क रास (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर, नोकरी करणाऱ्या व्यक्तीला त्यांचं काम करताना कोणतीही अडचण आली तर वरिष्ठ आणि सहकाऱ्यांची मदत मिळू शकते. तुमच्याबद्दल वाईट बोलून विरोधक थकणार नाहीत, ते तुमची बदनामी करतच राहणार.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, व्यावसायिकांना त्यांचं आऊटलेट एखाद्या नवीन ठिकाणी उघडायचं असेल तर त्यात यश मिळेल. सकाळी  8.15 ते 10.15 आणि दुपारी 1.15 ते 2:15 वाजताचा काळ तुमच्यासाठी चांगला राहील. कठोर परिश्रमानंतरच तुम्हाला अपेक्षित लाभ मिळेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, स्पर्धक विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासात गुंतून राहावं आणि यश मिळवावं.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आपलं शरीर निरोगी ठेवण्याच्या दिशेने वाटचाल केल्याने आपलं आरोग्य सुधारेल.

सिंह रास (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - व्याघ्र योगाच्या निर्मितीमुळे नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता वाढू शकते. काम करणाऱ्यांना आज जास्त काही करावं लागणार नाही, पण चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या मेहनतीचंही कौतुक होईल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, वेब डिझायनिंग, ब्लॉगर आणि ॲप डेव्हलपर व्यवसायात, तुम्हाला अपडेट राहण्यासाठी नवीन टीम नियुक्त करावी लागेल. व्यापाऱ्यांकडे त्यांच्या वस्तूंबाबत ग्राहक काही तक्रारी घेऊन येऊ शकतात.

विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल बोलायचं तर, विद्यार्थ्यांनी योग्य वेळापत्रकानुसार परीक्षेची तयारी सुरू करावी, हळूहळू यश मिळेल. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा किंवा खरेदीला जाण्याचा विचार करू शकता.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आरोग्याच्या दृष्टीकोनातून आरोग्याची काळजी घेणं चांगलं राहील. 

कन्या रास (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या विरोधात असल्याने तुम्ही विरोधकांच्या जाळ्यात अडकू शकता. नोकरी करणाऱ्या व्यक्तीवर जबाबदाऱ्यांचं ओझं वाढेल, त्यामुळे तुमच्या वागण्यात काही नकारात्मक बदल दिसू शकतात.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला आज व्यवसायात चांगला नफा मिळेल.

विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल सांगायचं तर, विद्यार्थ्यांचे मन अभ्यासावरुन विचलित होईल, त्यांना अभ्यासाऐवजी इतर कामं करायला आवडतील. एखाद्या गोष्टीबाबत हट्टी राहिल्याने तुमची मोठी हानी होऊ शकते.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज आरोग्य सामान्य राहील, परंतु प्रवासादरम्यान काळजी घ्या.

तूळ रास (Scorpio Horoscope Today)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य असणार आहे. आज कामाच्या ताणामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवू शकतो. 

व्यापार (Business) - तुमचा व्यापार चांगला चालणार आहे. व्यवसाय अधिक वाढविण्यासाठी तुम्ही पैसे गुंतवू शकता. 

तरूण (Youth) - आज तुमचा तुमच्या जोडीदाराबरोबरचा काळ एकदम चांगला जाणार आहे. भविष्या संदर्भात तुम्ही आज चर्चा कराल. 

आरोग्य (Health) - आज तुमची तब्येत एकदम ठणठणीत असणार आहे. तुम्हाला कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमचा बॉस एखाद्या कारणावरून तुमच्यावर नाराज होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला ओरडा पडू शकतो. 

व्यापार (Business) - तुमचा व्यवसाय चांगला चालला असल्या कारणाने तुमचा उत्साह अधिक वाढेल. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. 

तरूण (Youth) - स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगलं यश मिळेल. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे.  

आरोग्य (Health) - आज तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घ्या. पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमचा खूप चांगला जाणार आहे. पण, नोकरदार वर्गाने कामाच्या ठिकाणी सावध राहण्याची गरज आहे. 

व्यापार (Business) - तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित नवीन व्यवसाय देखील सुरु करू शकता.  

तरूण (Youth) - तरूणांना भविष्यात करिअरच्या चांगल्या संधी प्राप्त होतील.  

आरोग्य (Health) - तुमची तब्येत चांगली असणार आहे. फक्त पालेभाज्या आणि फळभाज्यांचं जास्त सेवन करा. 

मकर रास (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमचा चांगला जाईल. लवकरच नोकरीत चांगली बढती मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील. 

व्यवसाय (Business) - तुमचा व्यवसाय भविष्यात कसा पुढे नेता येईल याचा जास्त विचार करा. अन्यथा स्पर्धेत मागे राहाल. 

युवक (Youth) - आज काही कारणास्तव तुमचं मन विचलित होईल. तुमच्यामधला आत्मविश्वास गमावून देऊ नका. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. यासाठी ऑफिसमध्ये थोडा वेळ विश्रांती घ्या. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुमचा दिवस सामान्य असेल. सहकाऱ्यांशी आज चांगला ताळमेळ राहील. कामात प्रगती निश्चित आहे. 

व्यवसाय (Business) - ग्राहकांच्या मागणीप्रमाणे तुमच्या व्यवसायात नवीन गोष्टींचा समावेश करा. नक्की पुढे जाल. 

युवक (Youth) - ज्येष्ठ व्यक्तींच्या संपर्कामुळे तुमच्या भविष्यातील काही चिंता तुम्हाला शेअर करता येतील. तुमचं मन मोकळं होईल. 

आरोग्य (Health) - जे अस्थमाचे रूग्ण आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या वातावरणाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 

मीन रास (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी जास्त वर्क लोड असेल. त्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल.  

व्यवसाय (Business) - आज जे व्यापारी आहेत त्यांना कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास सुरळीत होईल. 

कुटुंब (Family) - आज कुटुंबात तुमच्या जमीन, संपत्तीविषयी चर्चा होईल. या चर्चेत तुम्हीही सहभागी व्हाल. 

आरोग्य (Health) - जर तुम्हाला कोणत्या गोळ्या सुरु असतील तर त्यात खंड पडू देऊ नका. यामुळे तुम्हाला जास्त अस्वस्थ वाटू शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Chanakya Niti : आयुष्यात कधीच पराभव होणार नाही, कोंबड्याकडून शिका 'या' बहुमूल्य गोष्टी; चाणक्य सांगतात...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget