Chaitra Navratri 2024 : नवरात्रीच्या चौथ्या दिवशी मेष, सिंह, कन्या राशीला होईल फायदा, तर 'या' राशींसाठी दिवस आव्हानात्मक; राशीभविष्य
Chaitra Navratri 2024 Horoscope Today : सकाळी 10:30 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत राहुकाळ राहील त्यानुसार इतर राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवार नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात.
Chaitra Navratri 2024 Horoscope Today : ज्योतिष शास्त्रानुसार,आज 12 एप्रिल 2024, शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज चैत्र नवरात्रीचा चौथा दिवस. त्यानुसार, आज दुपारी 1:12 पर्यंत चतुर्थी तिथी पुन्हा पंचमी तिथी असेल. आज रोहिणी नक्षत्र दिवसभर राहील. सकाळी 10:30 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत राहुकाळ राहील त्यानुसार इतर राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवार नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास
व्यापारी - व्यापारी वर्गाने व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. कामाच्या ठिकाणी नशिबावर अवलंबून राहू नका. मेहनत करत राहा.
नोकरी - नोकरदार वर्गाने आपल्या कामाबरोबरच इतरांनाही मदत करावी. मात्र, तुमच्या कामात दिरंगाई करू नका.
विद्यार्थी - आज जुन्या मित्राला भेटून खूप आनंद होईल. तुमच्या अंगात जर कला असेल तर तुमचं भविष्य फार उज्ज्वल आहे. करिअरचे चांगले पर्याय मिळतील.
वृषभ रास
व्यवसाय - जे व्यवसाय क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी जर तुम्ही ऑनलाईन क्षेत्रात आहात तर तुमच्या कामाची पद्धत बदलण्याची गरज आहे. ग्राहकांच्या दृष्टीकोनातून आपला बिझनेस सुरु ठेवा.
नोकरी - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरं जावं लागले. सहकाऱ्यांशी जरा जपूनच वागा.
आरोग्य - बदलत्या हवामानाचा हृदयाचे जे रूग्ण आहेत त्यांना त्रास होऊ शकतो. वेळेवर औषधं घ्या.
लव्ह लाईफ - तुमच्या प्रेमाला आनंदी ठेवण्यात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबात सुरु असलेले मतभेद आज दूर होतील.
मिथुन रास
व्यवसाय - तुमच्या व्यवसायात खर्च वाढल्यामुळे पैशांची आवक कमी होईल. व्यवसायात सावध राहा. आर्थिक संकट टाळण्यासाठी खर्चावर. नियंत्रण ठेवा.
नोकरी - नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असू शकतो. खूप मेहनत करावी लागेल. तरच यश मिळू शकतं.
कुटुंब - आज कुटुंबात देखील वातावरण काहीसं चिंता आणि तणावाचं असेल. छोट्या-छोट्या गोष्टींवरून खटके उडू शकतात.
आरोग्य - आज तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. बाहेरचं तेलकट, तिखट खाणं बंद करा.
कर्क रास
व्यवसाय - व्यवसायात विचार न करता प्रयोग करणे टाळा, अन्यथा नुकसानीला सामोरे जावे लागेल.
नोकरी - आज नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी अनुभवाच्या कमतरतेमुळे त्यांना काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.
कुटुंब - कुटुंबातील लोकांबरोबर आज प्रेमाचा आणि मनमोकळेपणाने संवाद होईल.
सिंह रास
व्यवसाय - आज बुधादित्य, सौभाग्य योग तयार झाल्यामुळे व्यवसायातील रखडलेले प्रकल्प पूर्ण होण्याबरोबरच नवीन प्रकल्पही मिळतील.
नोकरी - कामाच्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. एखाद्या कार्यरत व्यक्तीला सहकाऱ्यांमध्ये अधिकृतपणे कामाचे वितरण करण्याचे काम सोपवले जाऊ शकते. तुमचे काम प्रामाणिकपणे करा.
तरूण - नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांनी त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी शोधायला सुरुवात करावी.
आरोग्य - तुम्हाला अनेक प्रकारच्या आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
कन्या रास
व्यवसाय - व्यवसायात तुम्ही अवलंबलेल्या धोरणामुळेच तुमच्या व्यवसायात वाढ होईल.
नोकरी - कामाच्या ठिकाणी दिवस तुमच्या अनुकूल असेल. नोकरदार लोकांनी ते करण्यापूर्वी त्यांच्या कामाची रूपरेषा तयार करावी, असे केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे.
आरोग्य - आरोग्याच्या दृष्टीकोनातून बदलत्या हवामानात काळजी घेणे आवश्यक आहे.
विद्यार्थी - स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी जास्तीत जास्त उजळणी करावी लागेल. तरच तुमचा आत्मविश्वास वाढेल.
तूळ रास
व्यवसाय - व्यवसायात काही आर्थिक समस्यांमुळे तुमचे काम अडकू शकते. व्यापारी वर्गाला जपून काम करावे लागेल,
नोकरी - कामाच्या ठिकाणी अतिरिक्त कामाच्या बोजामुळे तुम्ही तणावाखाली असाल, ज्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.
लव्ह लाईफ - तुमच्या प्रेमाचा आणि जोडीदाराचा कोणताही निर्णय तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. ग्रहांची स्थिती पाहता खर्चाची शक्यता आहे.
आरोग्य - सूर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कामुळे उष्णता आणि थंडीची समस्या उद्भवू शकते.
वृश्चिक रास
व्यवसाय - आज बुधादित्य, सौभाग्य योग तयार झाल्यामुळे व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे.
नोकरी - नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील, ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल.
आरोग्य - आज सकाळपासून तुम्हाला उत्साही वाटेल. पण, सायंकाळी मन अस्वस्थ होईल.
विद्यार्थी - विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करून पुढील सत्रासाठी सज्ज व्हावे.
धनु रास
नोकरी - व्यवसायात तुमची कार्यशैली तुमची प्रतिमा इतरांपेक्षा वेगळी बनवेल.
व्यवसाय - व्यापारी वर्गाने आंधळेपणाने कुणालाही जास्त नफा मिळवण्यासाठी कर्ज देऊ नये. कामाच्या ठिकाणी भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका.
लव्ह लाईफ - तुमच्या मनातील भावना तुमच्या प्रेम आणि जोडीदारासोबत शेअर कराल. तुमच्या काही कामाचे सामाजिक स्तरावर कौतुक होईल.
आरोग्य -डोकेदुखी आणि चक्कर येण्याची समस्या असू शकते. जास्त उन्हात फिरू नका.
मकर रास
व्यवसाय - आज बुधादित्य, सौभाग्य योग तयार झाल्याने व्यवसायातील अडचणींवर मात करून तुमचा दर्जा वाढवण्यात यश मिळेल.
नोकरी - कामाच्या ठिकाणी नशीब तुमच्या बाजूने असल्यामुळे तुमचे काम कोणाच्याही मदतीशिवाय पूर्ण होईल.
कुटुंब - कुटुंबातील कोणाशी जुने वाद मिटतील. प्रेम आणि जोडीदाराच्या भावना समजून घेतल्याने संबंध सुधारतील.
आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत आज सतर्क राहा. प्रक्रिया केलेल्या अन्नापासून दूर रहा. अन्यथा, पोट बिघडू शकतं.
कुंभ रास
नोकरी - काम करणाऱ्या व्यक्तीने टीका ऐकून घाबरू नये, जर तुम्ही या गोष्टी सकारात्मक पद्धतीने घेतल्या तर तुम्ही तुमच्या उणिवांवर मात करू शकाल. तुमच्या बदललेल्या वागणुकीमुळे कुटुंबातील सर्वजण त्रस्त होतील.
कुटुंब - कौटुंबिक वादापासून दूर राहावे लागेल. वाणीवर नियंत्रण ठेवा.
आरोग्य - तुमच्या आरोग्यासाठीही वेळ काढला पाहिजे. तुमचे आरोग्य बिघडू शकते.
लव्ह लाईफ - प्रेम आणि वैवाहिक जीवनात तृतीय व्यक्तीचा प्रवेश अडचणी निर्माण करेल.
मीन रास
व्यवहार - आज बुधादित्य, सौभाग्य योग तयार झाल्यामुळे नवीन व्यवहार केल्यास व्यवसायात दुप्पट लाभ होईल. वडिलांना व्यवसायात मदत करणाऱ्यांना व्यवसायाशी संबंधित निर्णय घ्यावे लागतील. ते घेण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या वडिलांचा सल्ला घ्यावा लागेल.
नोकरी - कामाच्या ठिकाणी सर्वांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
कुटुंब - कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान तुमची एखाद्या खास व्यक्तीशी ओळख होऊ शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
आरोग्य - आरोग्याबाबत जागरूक राहणे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी चांगले राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: