Horoscope Today 11 October 2025: आजचा शनिवार 'या' 6 राशींसाठी नशीब पालटणारा! शनिकृपेने इच्छा पूर्ण होणार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 11 October 2025: आजचा शनिवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 11 October 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 11 ऑक्टोबर 2025, आजचा वार शनिवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज कामाचा उरक उत्तम राहील आणि चिकाटीने कामे पूर्ण कराल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज आरोग्याची साथ चांगली लागल्यामुळे कोणत्याही प्रकल्पांचे नेतृत्व तुमच्याकडे आपोआप येईल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज बोलण्यापेक्षा कामाकडे जास्त लक्ष द्याल, व्यापार धंद्यात तुमच्या हरहुन्नरी हुशार व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये चाकोरीबद्ध कामाचा कंटाळा आल्याने काम करता करता थोडी मौजमजा करण्याची लहर येईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज घरामध्ये जवळच्या माणसांचे उत्तम सहकार्य मिळेल, आर्थिक स्थिती सुधारेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज मुलांच्या नवीन विचारांचा आदर कराल, काही नवनिर्मिती करण्याचे सामर्थ्य राहील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज अधिकाराची इच्छा आणि संशोधन वृत्ती यांचा सुंदर मेळ झालेला दिसेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज थोडा अति स्पष्ट वाटते पण टाळायला हवा, नाहीतर लोकांची मने दुखावली जातील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज सतत काही ना काही करण्यात गुंतून जाणार आहात, तुमच्या बोलण्यात स्पष्टता ठेवा..
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज घरात आणि घराबाहेर उत्साहाचे आनंदी वातावरण राहील, एखादी मोठी गुंतवणूक करण्यासाठी काळ चांगला आहे
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज जोडीदाराशी तुमची मते जुळणार नाहीत, पण त्याकडे तुम्ही फारसे लक्षही देणार नाही
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालावे, बौद्धिक गोष्टींकडे ओढा राहील
हेही वाचा :
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीसाठी ऑक्टोबरचा नवीन आठवडा नशीब पालटणारा! तुमच्यासाठी कसा असेल आठवडा? साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















