Horoscope Today 11 October 2024 : आज नवमीचा दिवस 'या' 5 राशींसाठी असणार शुभ; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 11 October 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 11 October 2024 : पंचांगानुसार, आज 11 ऑक्टोबर 2024, शुक्रवारचा दिवस आहे. तसेच, आज शारदीय नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच नवमीचा दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. तसेच, आजचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
व्यवसायात साम-दाम-दंड-भेद या नितीने वागून तुम्ही ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण कराल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
थोडी आर्थिक चिंता असली तरी आवश्यक तेवढी पैशाची तरतूद नक्की होईल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
नोकरीमध्ये केवळ फायद्यावर डोळा ठेवून नवीन काम स्वीकारू नये.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आज शत्रूला पूर्णपणे कोंडीत पकडाल. तुमची कामे सहजगत्या होतील.
सिंह रास (Leo Horoscope Today)
कमी कष्टात विशेष त्रास न पडता कामे पूर्ण होतील.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
नशिबाची साथ खूप चांगली मिळेल कौटुंबिक सुख मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
उदार वृत्ती मुळे ओळखी जास्त होतील. महिला कलेच्या क्षेत्रात रमतील.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
नोकरीमध्ये वरिष्ठांच्या तालावर नाचावे लागले तरी काम फत्ते केल्यामुळे त्यांची मर्जी राहील.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
प्रेमीजनांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी राहाल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
विवाह करायचा आहे त्यांचे विवाह जमतील. तरुण अतिशय आधुनिक बनतील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
आज घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी पटणार नाही. प्रसंग सामो पचाराने घ्यावेत.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: