एक्स्प्लोर

Horoscope Today 11 March 2024 : आजचा सोमवार खास! भोलेनाथांची 'या' राशींवर राहणार विशेष कृपा; जाणून घ्या 12 राशींचं भविष्य

Horoscope Today 11 March 2024 : आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीलं आहे? कोणासाठी आजचा दिवस शुभ किंवा कोणासाठी आजचा दिवस अशुभ असेल? जाणून घेण्यासाठी वाचा आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 11 March 2024 : आजचा दिवस, सोमवार, 11 मार्च 2024, काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी खास असणार आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

मेष (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ असणार आहे. आज तुम्ही नवीन घर, जमीन, मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. परंतु आज तुम्हाला कौटुंबिक जीवनात समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या बोलण्याने तुम्हाला वाईट वाटू शकतं. आज तुम्हाला तुमचे जुने मित्र भेटतील. नोकरदारांचा कामावर दिवस चांगला जाईल, सहकाऱ्यांची मदत लाभेल. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. आज तुम्ही शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करू शकता.

वृषभ (Taurus Horoscope Today)

आज अतिरिक्त खर्चामुळे तुमचं मन चिंतेत राहील. महिलांना आज सासरच्यांकडून त्रास होऊ शकतो. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक डिनरचा प्लॅन करू शकता, यामुळे तुमच्या नात्यात गोडवा येईल आणि प्रेम वाढेल. आज नोकरीच्या ठिकाणी कामाच्या जबाबदाऱ्या काळजीपूर्वक हाताळा. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि खर्चाचा लेखाजोखा बनवा. बजेटनुसार पैसे खर्च करा, अन्यथा महिन्याच्या अखेरपर्यंत खिसा रिकामा होऊ शकतो.

मिथुन (Gemini Horoscope Today)

आज मिथुन राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील. पती-पत्नीच्या नात्यात प्रेम वाढेल. पैशाचं व्यवस्थापन अतिशय हुशारीने करा. तुमच्या खर्चाकडे नीट लक्ष द्या, आज जास्त खर्च करू नका. नोकरदारांनी आव्हानात्मक कामं अत्यंत काळजीपूर्वक हाताळावी. आज ऑफिसमध्ये लक्ष देऊन काम करावं, अन्यथा तुम्हाला ओरडा पडू शकतो. सकारात्मक मानसिकतेने करिअरमध्ये पुढे जा. यामुळे पदोन्नतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. अविवाहितांना आज लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात, लवकरच तुमचं लग्न ठरू शकतं. आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कर्क (Cancer Horoscope Today) 

आज तुम्ही पैशाचे व्यवहार टाळा. कुणालाही पैसे देऊ नका, तुम्हाला पैसे परत मिळण्यात अडचणी येऊ शकतात. आज व्यवसायात कोणतीही जोखीम घेऊ नका. कोणताही नवीन प्रकल्प सुरू करणं टाळा. आज तुम्हाला व्यवसायात थोडा तोटा सहन करावा लागू शकतो. कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य पाठपुरावा करा. आज तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुमच्या फटकळ बोलण्याने एखाद्याला त्रास होऊ शकतो. आज तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात भाग घेऊ शकता. आज तुमचं वैवाहिक जीवनात आनंद राहील आणि कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल.

सिंह (Leo Horoscope Today) 

आज व्यावसायिक जीवनात अनेक मोठे सकारात्मक बदल घडतील. तुम्हाला सगळीकडून नफा मिळेल. आज तुम्ही नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता, तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळेल. आज स्वत: ची काळजी घ्या, योगा किंवा व्यायाम करत राहा. आज कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या पडतील. नोकरीत वरिष्ठांचं सहकार्य मिळेल, परंतु कार्यालयीन राजकारणापासून तुम्ही दूर राहा. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. आज तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज कुटुंब आणि मित्रांच्या सहाय्याने तुमच्या सर्व समस्या सुटतील. 

कन्या (Virgo Horoscope Today) 

आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. आज तुमचे कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा, समोरच्याला वाईट वाटेल असं बोलू नका. विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका. व्यावसायिकांनी गुंतवणुकीसंबंधीचे निर्णय अत्यंत हुशारीने घ्यावे. खूप धोकादायक प्रकल्प सुरू करणं टाळा. आज कुटुंबातील सदस्यांशी वाद झाला असेल तरी ते तुम्हाला सहकार्य करतील आणि त्यांच्यामुळे तुमची एखादी समस्या सुटू शकते. काही लोकांना नोकरीच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रलंबित कामं मार्गी लावाल.

तूळ (Libra Horoscope Today) 

आज तुमचं जीवन ऊर्जा आणि उत्साहाने भरलेलं असेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तरीही, पैशाशी संबंधित निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्या आणि कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, अन्यथा तुम्हाला तोट्यात जावं लागेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी अधिक मेहनत करावी लागेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला ज्या समस्या येत आहेत त्या कुटुंबातील व्यक्तींसोबत शेअर करा. यामुळे समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला अधिक चांगलं मार्गदर्शन मिळेल. आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

आज कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आज तुम्हाला विरोधकांकडून त्रास सहन करावा लागू शकतो, ते वरिष्ठांचे कान भरू शकतात, ज्यामुळे तुम्हाला ओरडा मिळू शकतो. आज व्यवसायात अधिक लक्ष द्या, अन्यथा तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो. अविवाहित व्यक्तींना आज एखादी खास व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. आज तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवाल. आर्थिक बाबतीत थोडं सावध राहा. वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि जास्त ताण घेऊ नका.

धनु (Sagittarius Horoscope Today)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. आज तुम्ही आयुष्यात येणाऱ्या आव्हानांचा धैर्याने सामना करू शकाल. विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येऊ शकतो. जवळच्या मित्राच्या मदतीने जीवनातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या सोडवल्या जातील. तुम्ही अचानक कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅम बनवू शकता. नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळेल. आज पती-पत्नीच्या नात्यात गैरसमज वाढतील, परंतु संयम ठेवा आणि शहाणपणाने निर्णय घ्या. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका.

मकर (Capricorn Horoscope Today)

आज तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. पैशाशी संबंधित निर्णय आज अतिशय हुशारीने घ्या. हुशारीने गुंतवणूक करा आणि आर्थिक बाबतीत कोणतीही जोखीम घेऊ नका. नातेसंबंधातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या आरोग्याबाबत मन चिंतेत राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी किरकोळ आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. नवीन प्रकल्पाची जबाबदारी घेण्यास अजिबात संकोच करू नका. यामुळे प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. व्यावसायिकांनी आज खबरदारी बाळगावी.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीचा आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. दिवसाच्या सुरुवातीला आशा आणि निराशेच्या भावना दिसून येतील. आज तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यवसायाशी संबंधित निर्णय घेताना तुम्ही गोंधळात पडू शकता. अविवाहित लोकांच्या आयुष्यात आज एका खास व्यक्तीची एन्ट्री होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. काही लोकांना पोटाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

मीन (Pisces Horoscope Today)

आज मीन राशीच्या लोकांचा दिवस सामान्य जाईल. तुमचं आरोग्य आज चांगलं राहील. व्यावसायिकांनी अतिरिक्त जबाबदाऱ्यांसाठी तयार राहावं. काही लोकांना आव्हानात्मक कामं हाताळण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्ही आवश्यक घरगुती वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणं खरेदी करण्याचा विचार करू शकता. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधा, यामुळे लवकरच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरदारांनी आज कामात विशेष लक्ष द्यावं. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Uday : अवघ्या 8 दिवसांनी होणार शनीचा उदय; मेषसह 'या' 4 राशींचं नशीब पालटणार, अपेक्षेपेक्षा अधिक पटीने पगारवाढ मिळणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahajibapu Patil on Ekanath Shinde : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापूंचं वक्तव्यABP Majha Headlines : 8 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 10 October 2024 : 07 PM : ABP MajhaNair Hospital Case : डीनची बदली, विरोधकांची टीका; सुळे, पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Surya Grahan 2024 : उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
Embed widget