Horoscope Today 11 July 2025: आजचा शुक्रवार 'या' 4 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीचं घरात होणार आगमन, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 11 July 2025: आजचा शुक्रवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 11 July 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 11 जुलै 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज महिला थोड्या लहरी बनतील, नाचता येईना अंगण वाकडं असे युक्तिवाद केलेत तरी वास्तवाशी सामना करावा लागणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो प्रवासाचे बेत आखाल, परंतु प्रकृती सांभाळून प्रवास करावा लागेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज घरामध्ये मंगलकार्याची नांदी होईल, प्रेमवीरांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्याल, अशा वेळी मन स्वास्थ्य हरवून बसाल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज आर्थिक चणचण भासणार नाही, मोक्याच्या वेळी कुठूनही पैसा उभा राहू शकतो.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज व्यवसायातील तातडीच्या कामांना गती येईल, नोकरीमध्ये तुमच्या कामांना महत्त्व आल्यामुळे तुमचे महत्त्व वाढेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला फायद्याचा ठरेल, महिलांच्या कलेला प्रोत्साहन मिळेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमची निंदा केलेली तुम्हाला आवडत नाही, त्यामुळे आज ज्यांच्यावर मर्जी बसेल त्यांच्यासाठी सर्वस्व द्याल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज नवीन कल्पनांचे जनक बनाल आणि त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवाचे रान कराल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज विचार आणि बुद्धीचा जास्तीत जास्त वापर कराल, वैवाहिक जीवनात जोडीदाराशी जमवून घ्यावे लागेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज कलागुणांना वाव मिळेल, तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून बौद्धिक कामांकडे ओढा राहील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज संततीचे विचार न पडल्यामुळे खटके उडतील, महिलांना दोन पिढ्यांमधील फरक जास्त जाणवेल.
हेही वाचा :
Numerology: कितीही प्रयत्न करा, 'या' जन्मतारखेच्या लोकांचं 30 वयाच्या आधी लग्न होतच नाही! शनिदेवांचा हस्तक्षेप कारणीभूत? अंकशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















