Horoscope Today 10 October 2025: आजची संकष्टी चतुर्थी 'या' 6 राशींसाठी भाग्याची! बाप्पाच्या कृपेने नशीबाचे दरवाजे उघडणार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 10 October 2025: आजचा संकष्टी चतुर्थीचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 10 October 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 10 ऑक्टोबर 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आज संकष्टी चतुर्थी असल्याने हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज भांडवलाची सोय झाल्यामुळे एखाद्या काम करण्याचा आनंद मिळेल आर्थिक स्वातंत्र्य मिळेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचा मागवा घ्याल. घरामध्ये सर्वांच्या गरजा पुरवण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करताना थोडा ताण जाणवेल दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी वेळ काढाल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज जुन्या पारंपारिक विचारांना धरून बसाल कारण नसताना काळजी करण्याचा स्वभाव राहील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज आत्मविश्वास आणि उत्साह अंगी बाणवाल. कामाची गती वाढवाल कष्टदायक दिवस
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज कष्टाचे डोंगर चढावे लागले तरी बौद्धिक क्षेत्रात संशोधन आणि नावीन्य निर्माण करण्यात अग्रेसर राहाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज आर्थिक स्वातंत्र्य मिळेल पण कोणताही अविचार हातून होता कामा नये
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल ज्यांना पाठीच्या मणक्याचे दुखणे आहेत त्यांनी औषधोपचार आणि व्यायाम याकडे लक्ष द्यावे
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज कामानिमित्त परदेशी गमनाच्या संधी मिळतील मनातील सुप्त इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज अति तापटपणा करता उपयोगी नाही त्यामुळे हाती आलेल्या संधी निघून जाण्याची शक्यता आहे
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज पित्त प्रकृती असणाऱ्यांनी पथ्य पाणी सांभाळावे संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज मनातील उदासीनतेचे भवरे नष्ट करून टाकले तर उत्साही राहाल महिला धडाडी दाखवतील
हेही वाचा :
Sankashti Chaturthi 2025: पुढच्या 24 तासांत 'या' 5 राशींचं नशीब पालटणार! संकष्टी चतुर्थीला शुक्र-शनि-चंद्राचा पॉवरफुल संयोग! हातात खेळेल पैसा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















