(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 10 August 2024 : धनु राशीसाठी आजचा दिवस अत्यंत उत्साहाचा; तर तूळ, वृश्चिक राशीसाठी सावधानतेचा इशारा; वाचा आजचं राशीभविष्य
Horoscope Today 10 August 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
Horoscope Today 10 August 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
तूळ रास (Libra Horoscope Today)
नोकरी (Job) - जे लोक मार्केटिंग क्षेत्रात काम करतायत त्यांना आज चांगला नफा मिळेल. तुमच्या कामावर बॉसदेखील खुश असेल.
व्यवसाय (Business) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. त्यामुळे तुम्ही देखील खुश असाल.
युवक (Youth) - तुमच्या आसपास असलेल्या मुक्या प्राण्याची, पक्ष्याची सेवा केल्यास तुम्हाला त्यातून चांगलं पुण्य मिळू शकतं.
आरोग्य (Health) - आज कोणत्याही ताणतणावापासून दूर राहा. कारण हा तणाव तुम्हाला शारीरिकच नाही तर मानसिकरित्याही कमजोर बनवेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
नोकरी (Job) - जर तुमचं ऑनलाईन का असेल तर तुमचा डेटा योग्यरित्या सांभाळून ठेवा. अन्यथा, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला ओरडा मिळू शकतो.
व्यवसाय (Business) - आज कोणताही कागदोपत्री व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्रं नीट वाचून घ्या. मगच सही करा.
कुटुंब (Family) - आज कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांशी नीट संवाद साधा. उद्धट बोलू नका. अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
आरोग्य (Health) - जर तुम्हाला किडनीच्या संबंधित आजार असल्यास वेळेवर औषधं घ्या. अन्यथा तुम्हाला हा आजार त्रास देऊ शकतो.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. परदेशातून तुम्हाला नोकरीची ऑफर मिळू शकते.
व्यवसाय (Business) - आज व्यवसायिकाने सरकारी टॅक्स भरण्याच्या कामात अजिबात दिरंगाई करू नये. अन्यथा तुम्हाला ती महागात पडू शकते.
युवक (Youth) - तरूणांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रामाणिकपणे करावा. तरच तुम्हाला भविष्यात यश मिळू शकतं.
आरोग्य (Health) - आज डोकेदुखीच्या त्रासाने तुम्ही खूप त्रस्त असाल. यासाठी वेळेवर विश्रांती घ्या. अपुऱ्या झोपेमुळे हा त्रास होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: