Horoscope Today 08 May 2025: आजचा गुरूवार 6 राशींसाठी ठरणार भाग्यशाली! स्वामी समर्थांच्या कृपेने इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 08 May 2025: आजचा गुरूवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 08 May 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 08 मे 2025, आजचा वार गुरूवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आज शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शुभ परिणाम देणारे ग्रहमान आहे, कौटुंबिक सौख्य लाभेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात एकमेकांना समजावून घ्याल, तुमच्या क्षमाशील आणि उदार वृत्तीचा इतरांना अनुभव घेता येईल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज नोकरी धंद्यात भाग्यदयाचे प्रसंग येतील नावलौकिक आणि किर्ती लाभेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज आपल्यावर असलेली जबाबदारी पार पडल्यास यश मिळेल, महिलांना आपल्या आवडी जोपासण्याच्या संधी मिळतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज इतरांशी संपर्क ठेवण्यात आणि गप्पागोष्टी करण्यात दिवस आनंदात जाईल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज पडलेली सरकारी कामे मार्गी लागतील त्यासाठी जास्त प्रयत्न करा
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज कलाकारांना आपल्या कलेचा अभिमान वाटेल अशा घटना घडतील, महिलांना नाविन्याची आवड निर्माण होईल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज व्यवसाय धंद्यामध्ये कामाच्या बाबतीत तुम्ही दाखवलेला तडफदारपणा फायदेशीर ठरेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज तुमची बुद्धी आणि कल्पनाशक्ती यांचा सुरेख संगम तुमच्या कामांमध्ये दिसेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये आत्मविश्वासाने काम केल्यामुळे वरिष्ठांची मर्जी राखाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज स्वतंत्र काम करण्यात आनंद वाटेल, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात लोकांच्या मर्जीस उतराल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज प्रसिद्धी माध्यमातून लाभ मिळेल, नोकरी व्यवसायामध्ये प्रचंड आत्मविश्वासाने पावले टाकाल
हेही वाचा:
Shani Transit: खूप सोसलं, आता होणार चांगभलं! 2025 च्या शेवटी शनिदेव 'या' 3 राशींवर होणार मेहेरबान, सोन्याचे दिवस येणार...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















