Horoscope Today 07 December 2024 : आज 'या' 5 राशींनी राहावं सावधान, शनीची असेल वक्रदृष्टी; वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 07 December 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
Horoscope Today 07 December 2024 : पंचांगानुसार, आज 07 डिसेंबर 2024, शनिवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
शिस्त आणि ठाम स्वभावामुळे परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
पटकन कोणावर विश्वास ठेवणार नाही. पाठीमागून निंदा करणारे भेटतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
आर्थिक दृष्टीने थोडा पेचात टाकणारा दिवस आहे. पटकन कोणतेही निर्णय घेऊ नका
कर्क रास (Cancer Horoscope Today)
संकटाशी टक्कर देऊन ध्येय गाठण्यामध्ये आघाडीवर राहाल
सिंह रास (Leo Horoscope Today)
संततीच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. महिलांना पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे लागेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
ज्या गतीने पैसा हाती येणे आवश्यक आहे त्या मानाने तो न आल्यामुळे थोडी चिंता लागून राहिल
तूळ रास (Libra Horoscope Today)
अचानक उद्भवणाऱ्या खर्चाची तोंड मिळवणे करण्यात शक्ती खर्च पडेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
कर्माच्या बाबतीत भाग्याची साथ असल्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
कष्टाला पर्याय नाही याची जाणीव होईल त्यामुळे जास्तीत जास्त तिकडे लक्ष देऊन कामाला लागा
मकर रास (Capricorn Horoscope Today)
चिकाटी आणि दीर्घोद्योग करून यश मिळाल्यानंतर खूप आनंद वाटेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
मुलांच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये सुधारणा झाल्याचे लक्षात येईल
मीन रास (Pisces Horoscope Today)
आज सर्व बाबतीत सुधारणा होईल फक्त तुमची सांगण्याची पद्धत सहज सोपी चांगली असू द्या
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: