Surya Gochar 2024 : सूर्याचं गुरु राशीत संक्रमण, सरत्या वर्षात 'या' 3 राशींवर असणार सूर्यदेवाची कृपा; मार्गातील अडथळे होतील दूर
Surya Gochar 2024 : 15 डिसेंबर रोजी सूर्य राशी परिवर्तन करणार आहे. सध्या सूर्य वृश्चिक राशीत विराजमान आहे.
Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्याला (Surya Gochar) ग्रहांचा राजा म्हटलं जातं. सूर्य ग्रह प्रत्येक महिन्यातून एकदा राशी परिवर्तन करतात. त्यानुसार, 15 डिसेंबर रोजी सूर्य राशी परिवर्तन करणार आहे. सध्या सूर्य वृश्चिक राशीत विराजमान आहे. त्यानंतर सूर्य वृश्चिक राशीचा धनु राशीतून प्रवास संपेल. गुरुचा धनु राशीत सूर्याचं संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी शुभकारक तर काही राशींसाठी अशुभ असणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
सूर्याचा गुरु राशीत प्रवेश
दृक पंचांगानुसार, सूर्य 15 डिसेंबरला धनु राशीत संक्रमण करणार आहे. सूर्याचं संक्रमण रविवारी जवळपास रात्री 10 वाजून 19 मिनिटांनी होणार आहे. धनु राशीत सूर्य 13 जानेवारी 2025 पर्यंत विराजमान असणार आहे. त्यानंतर, 14 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
सूर्याच्या संक्रमणाने धनुच्या संक्रमणाने तूळ राशीच्या लोकांना याचे शुभ परिणाम मिळू शकतात. या दरम्यान तुम्ही फार सकारात्मक असाल. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमच्या कामाप्रती तुम्ही एकनिष्ठ असाल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. सरकारी योजनेचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
सूर्याचा धनु राशीत संक्रमण केल्याने कर्क राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, कोर्ट-कचेरीच्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे. तसेच, तुमच्या व्यवसायातही तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना शनीच्या राशी परिवर्तनाने चांगला लाभ मिळणार आहे. या राशीचा स्वामी ग्रह सूर् आहे. त्यामुळे तुमच्यावर सूर्यदेवाची कृपा असणार आहे. तुम्हाला कुटुंबियांचा चांगला सपोर्ट मिळेल. या काळात तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, तुमची सगळी स्वप्न साकार होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: