(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 06 September 2024 : मिथुन राशीचे लोक जबाबदारीने वागतील, तर मेष, वृषभ राशीच्या लोकांना 'या' चुकांचा होईल पश्चाताप; वाचा तुमचं राशीभविष्य
Horoscope Today 06 September 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 06 September 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
मेष रास (Aries Today Horoscope)
नोकरी (Job) - आज तुम्ही ऑफिसमध्ये परिस्थिती पाहून सर्वांशी वागा. उगाच गंभीर परिस्थितीत तुमच्या वागणुकीने तुम्हाला बोलणी खावी लागू शकतात. त्यामुळे जरा सावध व्हा.
व्यवसाय (Business) - जे व्यावसायिक चांदीचा व्यापार करतायत त्यांचा व्यवसाय आज चांगला चालेल. आठवड्याची सुरुवात चांगली आहे.
विद्यार्थी (Student) - जे विद्यार्थी परीक्षेचा मनापासून अभ्यास करतायत त्यांच्या आयुष्यात लवकरच मोठा बदल दिसून येणार आहे. तुमची आवड जपत राहा.
आरोग्य (Health) - आज तुम्हाला अॅसिडीटी त्रास होऊ शकतो. वातावरणातील बदलामुळे पोट देखील बिघडू शकतं. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा.
वृषभ रास (Taurus Today Horoscope)
नोकरी (Job) - आज तुम्हाला शासनाच्या एका प्रोजेक्टच्या संदर्भात विचारणा केली जाऊ शकते. तुम्ही सर्व काम नीट समजून प्रामाणिकपणे करा.
व्यवसाय (Business) - व्यापाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांबरोबरचं वर्तन चांगलं ठेवावं. उगाच अरेरावीची भाषा करू नये.
तरूण (Youth) - तुमच्या आयुष्यात आता जे काही घडतंय त्याचा दोष इतरांना देऊ नका. अशा वेळी संयम बाळगा. हेही दिवस निघून जातील हा विश्वास मनात ठेवा.
आरोग्य (Health) - आज तुम्हाला जास्त उन्हाचा त्रास सहन करावा लागू शकतो. काही कारणास्तव तुम्हाला आज बाहेरचं काम करावं लागेल. अशा वेळी आरोग्याची योग्य काळजी घ्या.
मिथुन रास (Gemini Today Horoscope)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्ही वेळेचा सदुपयोग कराल. सर्व कामे जबाबदारीने पार पाडाल. त्यामुळे बॉसही तुमच्यावर खुश असतील.
व्यवसाय (Business) - हार्डवेयरचा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येतील.
युवक (Youth) - आज तुमचे तुमच्या भावा-बहिणीबरोबर काही शाब्दिक वाद होऊ शकतात. अशा वेळी वाणीवय नियंत्रण ठेवा.
आरोग्य (Health) - ज्यांना फीट्स येण्याचा त्रास आहे त्यांनी जास्त काळजी घ्यावी. हा त्रास पुन्हा येण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा