Horoscope Today 06 April 2025: आजचा रविवार 4 राशींसाठी भाग्याचा! श्रीखंडोबाच्या कृपेने कामात यश मिळेल, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 06 April 2025 : आजचा रविवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 06 April 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 06 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार रविवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज अहंकार दुखावला गेल्यास दुसऱ्यावर कुरघोडी करायला कमी करणार नाही.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज मुलांना तुमची मते न पटल्यामुळे त्यांच्याशी वाद होण्याची शक्यता.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज सामंजस्याची भूमिका घेणे महत्त्वाचे ठरेल अचानक खर्च उद्भवतील.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज आवश्यक पैसा खर्च होईल, पूर्वी केलेल्या गुंतवणुकीत थोडा तोटा सहन करावा लागेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज रक्तदाब हृदयविकार असणाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, या म्हणीचा प्रत्यय येईल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज स्वतःला सर्व कामे करावी लागल्यामुळे शारीरिक थकवा येईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महिलांना आपल्या गुणाची कदर होत नाही हे जाणवेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज अतिताठ भूमिका ठेवत, बाहेरून लवचिक आहोत असे लोकांना भासवाल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्या प्रभावी बोलण्याचा परिणाम समोरच्या माणसावर होऊन कामे मार्गी लागतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज तुमचा मूळचा धोरणीपणा तुमची कामे यशस्वी करण्यासाठी फायद्याचा ठरेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो व्यवसाय नोकरीत जे ठरवलं ते करून दाखवाल, मग त्यासाठी किती कष्ट पडले तरी त्याची पर्वा करणार नाही.
हेही वाचा>>
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींची लॉटरी लागणार? एप्रिलचा नवा आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य वाचा..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















