Hindu Faith : या 'दहा' व्यक्तींच्या चुकूनही पाया पडू नका, नाहीतर संपूर्ण आयुष्य होईल बरबाद
काही व्यक्तींच्या पाया पडल्यानंतर आपल्या प्रत्येक कामात विघ्न येतात आणि कोणतेही काम मनासारखे होत नाही. काही लोकांच्या पायांना स्पर्श केल्याने व्यक्तीला जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया कोणाच्या पाया पडू नये
Hindu Faith : प्राचीन काळापासून विद्वान आणि वडीलधार्या मंडळींच्या पाया पडण्याची प्रथा सुरु आहे. या प्रथेकडे मान-सन्मान देण्याच्या दृष्टीने पाहिले जाते. हे तर सर्वांनाच माहिती आहे की वडीलधार्या मंडळींच्या पाया पडावे हे आपल्याला सांगितले जात आहे. मात्र हे फार कमी लोकांना महिती असेल की या पाच व्यक्तींच्य पाया पडणे हे अशुभ मानले जाते. या व्यक्तींच्या पाया पडल्यानंतर आपल्या प्रत्येक कामात विघ्न येतात आणि कोणतेही काम मनासारखे होत नाही. काही लोकांच्या पायांना स्पर्श केल्याने व्यक्तीला जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला याविषयी जाणून घेऊया.
पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये
एखादी व्यक्ती पूजा करत असेल तर त्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करू नये. अन्यथा पूजेत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर मंदिरातही कोणाच्या पाया पडणे योग्य मानले जात नाही. कारण मंदिर हे देवाचे स्थान आहे आणि येथे पाया पडल्यास मंदिराचे पावित्र्य भंग होऊ शकते
कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये
हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते. कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो. हिंदू मान्यतेनुसार, मामा आणि मामीने त्यांच्या भाचा किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये.
स्मशानभूमीतून आलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये
हिंदू धर्मात असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती स्मशानभूमीवरून परत येत असेल तर त्या व्यक्तीच्या पायाला हात लावू नये, मग तो आपल्यापेक्षा मोठा असला तरीही. असे करणे अशुभ मानले जाते.
झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये
झोपलेल्या व्यक्तीच्या पायांनाही स्पर्श करू नये.झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये, कारण झोपलेली व्यक्ती मृतवत दिसते आणि आणि आपण मृत व्यक्तीच्याच पाया पडतो.
शत्रूला कधीच करु नका नमस्कार
आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये. कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो. आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये.
साधू- संन्यासींकडून पाया पडून घेऊ नये
साधू-संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात.
जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये
जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात, कारण पौराणिक कथेत शिव शंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती.
भाच्याने मामाच्या पाया पडू नये
भाच्याने मामाच्या पाया पडू नये, हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते, कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता.
जेवताना पाया पडू नये
एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये.
प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये
तसेच तुमच्या बरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली, तरी तुमच्या बरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)