Hanuman Jayanti 2026 : हनुमान जयंतीला 12 राशींनी करा खास 'हे' उपाय; शनिची ढैय्या आणि साडेसातीतूनही मिळेल मुक्ती
Hanuman Jayanti 2026 : हनुमान जयंतीनिमित्त सर्व 12 राशींनी करावेत असे खास उपाय या ठिकाणी देण्यात आले आहेत.

Hanuman Jayanti 2026 : हनुमान जयंती (Hanuman Jayanti) हा हनुमानाची कृपा संपादन करण्यासाठी अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. विशेषतः ज्यांच्यावर शनीची साडेसाती किंवा ढैय्या सुरू आहे, त्यांच्यासाठी हनुमानाची उपासना हे रामबाण आहे. या संदर्भात डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती दिली ती जाणून घेऊयात.
सर्व राशींसाठी आणि विशेषतः शनी दोषाने त्रस्त असलेल्यांसाठी काही खास उपाय दिले आहेत:
ज्या राशींवर सध्या शनीचा प्रभाव आहे (उदा. कुंभ, मीन, मेश किंवा सिंह धनु ढैय्या), त्यांनी खालील गोष्टी कराव्यात:
1. तेल आणि शेंदूर अर्पण: हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाला चमेलीचे तेल आणि शेंदूर अर्पण करा. यामुळे शनीचा पिडा कमी होतो.
2. सुंदरकांड पठण: हनुमान जयंतीच्या दिवशी 'सुंदरकांड' वाचणे सर्वात फलदायी मानले जाते. जर पूर्ण वाचणे शक्य नसेल, तर किमान हनुमान चालीसा ११ वेळा वाचावी.
3. काळे तीळ आणि मोहरीचे तेल: एका वाटीत मोहरीचे तेल घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाका आणि त्यात स्वतःचे तोंड पाहून ते तेल हनुमानासमोर अर्पण करा (छाया दान).
4. पिंपळाच्या पानांचा हार :11 पिंपळाची पाने स्वच्छ धुवून त्यावर स्वस्तिक काढा आणि त्याचा हार मारुतीला घाला.
सर्व 12 राशींसाठी खास उपाय
मेष आणि वृश्चिक
हनुमानाला बूंदीच्या लाडवांचा नैवेद्य दाखवा आणि लाल फुलं अर्पण करा.
वृषभ आणि तूळ
हनुमानासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि अष्टक पठण करा.
मिथुन आणि कन्या
देवाला विड्याचे पान (पान विडा) अर्पण करा. त्यात कात, चुना, सुपारी आणि गुलकंद असावा.
कर्क
हनुमानाला कच्च्या दुधाचा अभिषेक किंवा पांढरी मिठाई अर्पण करा.
सिंह
गूळ आणि हरभऱ्याचा (फुटाणे) नैवेद्य दाखवा. 'ॐ रामदूताय नमः' जप करा.
धनु आणि मीन
हनुमानाला पिवळी फुले आणि बेसनाचे लाडू अर्पण करा.
मकर आणि कुंभ
मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंगा टाका.
महत्त्वाचे नियम :
ब्रह्मचर्य: हनुमान जयंतीच्या दिवशी पूर्णतः ब्रह्मचर्याचे पालन करावे.
राम नाम जप: हनुमानाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे 'राम' नामाचा जप करणे. जिथे राम नाव घेतले जाते, तिथे हनुमान स्वतः उपस्थित असतात असे मानले जाते.
दान धर्म: या दिवशी गरजू लोकांना केळी किंवा जेवण दान केल्याने पुण्य मिळते.
डॉ. भूषण ज्योतिर्विद
हे ही वाचा :
Trigrahi Yog 2026 : सूर्य, शनि आणि मंगळ ग्रहामुळे जुळून येणार 'त्रिग्रही राजयोग'; हनुमान जयंतीपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार, पदरात फक्त पुण्य



















