Hanuman Jayanti 2025 : यंदा हनुमान जयंतीला भद्राचं सावट असणार? जाणून घ्या बजरंगबलीच्या पूजेचा शुभ मुहूर्त, विधी आणि पूजेसाठी लागणारं साहित्य
Hanuman Jayanti 2025 : हनुमानाला संकटमोचन असंही म्हणतात. कारण तो भक्तांचं संकट दूर करतात. मात्र, पंचांगानुसार, यंदा हनुमान जयंतीच्या दिवशी भद्राचं सावट असणार की नाही ते जाणून घेऊयात,

Hanuman Jayanti 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, दरवर्षी चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती (Hanuman Jayanti) मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. या दिवशी भक्त हनुमानाची पूजा करतात. उपवास धरतात. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान हनुमानाला रुद्राचा अवतार म्हटलं जातं. आणि कलयुगात चिरंजीवी असं म्हणतात. हनुमानाला संकटमोचन असंही म्हणतात. कारण तो भक्तांचं संकट दूर करतात. मात्र, पंचांगानुसार, यंदा हनुमान जयंतीच्या दिवशी भद्राचं सावट असणार आहे. त्यामुळे हनुमान जयंतीची पूजा, तिथी, विधी, शुभ मुहूर्त नेमका काय असणार आहे ते जाणून घेऊयात.
हनुमान जयंती तिथी 2025
चैत्र पौर्णिमा तिथीची सुरुवात - 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 03 वाजून 21 मिनिटांनी होणार आहे.
पौर्णिमा तिथी समाप्ती - 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 05 वाजून 51 मिनिटांनी असेल.
उदय तिथीनुसार हनुमानाचा जन्मोत्सव - शनिवारी 12 एप्रिल 2025 रोजी असणरा आहे.
हनुमान जयंती 2025 पूजेचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त - सकाळी 04.29 वाजल्यापासून ते 05.14 वाजेपर्यंत असेल.
अभिजीत मुहूर्त - दुपारी 11.56 ते 12.048 पर्यंत असेल.
विजय मुहूर्त - दुपारी 02.30 वाजल्यापासून ते 03.21 वाजेपर्यंत असणार आहे.
भद्रा काळची वेळ
भद्रा सुरुवात - सकाळी 05 वाजून 59 मिनिटांनी भद्रा काळ सुरु होणार आहे.
भद्रा समाप्ती - संध्याकाळी 04 वाजून 35 मिनिटांनी भद्रा काळ संपणार आहे.
हनुमान जयंतीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य
भगवान हनुमानाचा फोटो, लाल रंगाचे वस्त्र किंवा लंगोट, लाल फूल, माळ, तांदूळ (अक्षता), चंदन, धूप, दिवा, तूप, पानं, सुपारी, लवंग, वेलची, विडा, शेंदूर, भगवान हनुमानाचा ध्वज, हनुमान चालीसा, शंख, घंटा, नैवेद्य आणि प्रसाद (विशेषत: बुंदीचा लाडू)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















