एक्स्प्लोर

Hanuman Jayanti 2024 : संगमनेरमध्ये चक्क महिला ओढतात हनुमानाचा रथ; ब्रिटिश काळापासूनची परंपरा अजूनही कायम, वाचा रंजक कहाणी

Hanuman Jayanti 2024 : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये साजरा होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाला आगळं वेगळ महत्व आहे. या ठिकाणी निघणाऱ्या रथ यात्रेत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान महिलांना मिळतो.

Hanuman Jayanti 2024 : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात ब्रह्मचारी असणाऱ्या हनुमंताचा रथ ओढण्याचा मान हनुमान जयंतीला (Hanuman Jayanti) महिलांना दिला जातो. अगदी ब्रिटीशांच्या काळापासून ही परंपरा सुरू आहे. ब्रिटीशांनी बंदी घातलेल्या रथावरील बंदी झुगारून शेकडो महिलांनी 1929 साली रथ यात्रा काढली होती, तेव्हापासून ही परंपरा अजूनही सुरू आहे. या रथयात्रेदरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जातो.

ब्रिटीशांनी घातली होती रथावर बंदी

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये साजरा होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाला आगळं  वेगळं महत्व आहे. या ठिकाणी निघणाऱ्या रथ यात्रेत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान महिलांना असून हा मान मिळवण्यासाठी शेकडो महिला दरवर्षी याठिकाणी गर्दी करतात. महिलांना या ठिकाणी मिळणाऱ्या मानाला ब्रिटीश कालीन इतिहास असून ब्रिटीशांनी या रथ यात्रेवर बंदी घालून अनेक तरुणांना ताब्यात घेतलं होतं.

सरकारी ताकदीसमोर नेते मंडळीही झुकली

23 एप्रिल, 1929 रोजी हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला. पोलीस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस विरोध करत होते. आता पाहून नेते मंडळींनी माघार घेतली आणि ते आपापल्या घरी गेले. एवढ्यात अचानक 200-250 स्त्रियांनी एकत्र येऊन रथ ताब्यात घेतला. हळूहळू स्त्रियांची संख्या 500 वर गेली. पोलिसांनी स्त्रियांबरोबर अनेक युक्तिवाद केले, त्यांना भीती दाखवली, अटक करण्याची- खटले भरण्याची धमकीही दिली, पण महिला काही ऐकेना.

आदिशक्तीरुपी महिलांनी दाखवलं साहस

पोलिसांनी सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला, पण या आदिशक्तीस्वरुप भारतीय नारींनी आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार चालूच ठेवला. याच गडबड-गोंधळाचा फायदा घेत झुंबरबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे आणि इतर मुली, स्त्रीयांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा ठेवली आणि  "बलभीम हनुमान की जय"चा नारा दिला. यानंतर कुणालाही काही कळण्याच्या आत त्यांनी रथाचा दोर ओढण्यास सुरुवात केली.

पोलिसांकडून झाला आडकाठी आणण्याचा प्रयत्न

1929 ला महिलांनी चौकातून रथ ओढत संत वाड्याच्या पुढे नेला, यानंतर पोलिसांनी बैलगाड्या आडव्या लावून रथ अडवला, तेव्हा दोन महिने हा रथ रंगार गल्लीतच उभा ठेवण्यात आला, त्यानंतर पोलिसांनी माघार घेतली आणि झुंबराबाईंचा प्रातिनिधिक सत्कार करुन दरवर्षी ही परंपरा कायम ठेवण्याचं अभिवचन दिलं. महिला सन्मानाची प्रथा नंतरच्या काळात थांबली, पण ध्वज नेण्याची परंपरा आजही अखंडीत आहे.

असं चित्र राज्यात कधी?

महाराष्ट्रात अनेक मारूती मंदिरांत आजही महिलांना जाण्यास मनाई असताना संगमनेरमध्ये मात्र हनुमान जयंतीच्या निमित्ताने निघणारा रथ महिला ओढत असतानाचं हे चित्र बघितल्यावर इतरांनीही अंधश्रद्धा बाजूला ठेवून प्रत्येक ठिकाणी महिलांना समान अधिकार द्यायलाच हवा, असं म्हणावं लागेल. 

हेही वाचा:

Hanuman Temples In Pune : जिलब्या, डुल्या, भांग्या...; पुण्यातील हनुमान मंदिरांना इतकी विचित्र नावं का पडली? जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारेAjit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेटSandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.