एक्स्प्लोर

Hanuman Jayanti Wishes : हनुमान जयंतीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; बजरंगबलीचं आठवा रुप, पाठवा 'हे' मेसेज

Hanuman Jayanti Wishes in Marathi : दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अंजनी मातेच्या पोटी श्री हनुमानाचा जन्म झाला.

Hanuman Jayanti Wishes in Marathi : महारुद्र, हनुमंत, बजरंगबली, मारूती, महावीर, पवनपुत्र, पवनसुत अशा अनेक नावांनी संबोधल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती (Hanuman Jayanti 2024) देशभरात साजरी केली जाते. यंदा हनुमान जयंती 23 एप्रिलला साजरी होत आहे, याच दिवशी चैत्र पौर्णिमा देखील असते. हनुमानाचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी झाला, त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून ओळखली जाते. यंदाच्या हनुमान जयंतीला तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना, जवळच्या व्यक्तींना मराठीमध्ये हनुमान जयंतीचे संदेश पाठवून खास शुभेच्छा (Hanuman Jayanti Wishes In Marathi) देऊ शकता.

हनुमान जयंती शुभेच्छा संदेश (Hanuman Jayanti Wishes In Marathi)

अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान
एकमुखानं बोला, बोला जय जय हनुमान
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
अनादिनाथ पूर्ण तारावयासी
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला
हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

राम, लक्ष्मण, जानकी
जय बोला हनुमान की!
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम
अशा बजरंगबलीला आमचे कोटी कोटी प्रणाम!
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीश तिहु लोक उजागर,
राम दूत अतुलित बाल धामा,
अंजलि पुत्र पवन सूत नामा,
जय श्री राम, जय हनुमान…
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात
आनंद, शांती आणि समृद्धी देवो
आणि त्याची कृपादृष्टी
आपल्या परिवारावर कायम राहो
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैखरी
हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

महावीर जब नाम सुनावे..
नासे रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमत वीरा..
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूतीरायाचा विजय असो..
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

भूत पिशाच निकट नहीं आवे,
महावीर जब नाम सुनावे,
नासे रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमत वीरा
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार आहे तू,
अंजनीचा लाल आणि
दुष्टांचा काल आहे तू.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

पवनपुत्र, अजंनीसूत, प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त मारुती रायाचा विजय असो..
हनुमान जयंतीच्या आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

हेही वाचा :

Shani Dev : हनुमानाची पूजा करणाऱ्यांना शनि का त्रास देत नाही? जाणून घ्या खरं कारण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget