Astrology : गुरुची सरळ चाल करणार कमाल; 3 राशींचं नशीब पालटणार, नोकरी-व्यवसायात यशच यश
Guru Margi 2025 : गुरू ग्रह वृषभ राशीत मार्गी झाला आहे, याचा 3 राशींना अफाट लाभ होणार आहे. येणाऱ्या काळात तुमच्या सुख-संपत्तीत अपार वाढ होईल.

Guru Margi 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु हा ज्ञान, समृद्धी, शिक्षण आणि वैवाहिक सुखाचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा गुरूच्या हालचालीत बदल होतो, तेव्हा या क्षेत्रांवर विशेष परिणाम दिसून येतो. गुरू 2 फेब्रुवारी रोजी सरळ चालीत मार्गी झाला आहे. यामुळे काही राशींचे अच्छे दिन सुरू होतील. तसेच, या राशीच्या लोकांच्या धन-संपत्तीत वाढ होईल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
गुरूची सरळ चाल तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच यावेळी तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकाल. या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील, तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं अधिक घट्ट होईल. प्रेमसंबंध मजबूत होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमचं आरोग्य सुधारेल. जे काम करायचं ठरवलं होतं ते पूर्ण होईल. जीवनातील नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी होईल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी गुरुची सरळ चाल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ सिद्ध होऊ शकते. कारण गुरु ग्रह तुमच्या राशीतून थेट तुमच्या कर्म स्थानात प्रवेश करेल. त्यामुळे या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. याशिवाय, नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना नफ्याच्या अनेक संधी मिळतील आणि पैसे कमवण्याचे नवीन मार्गही सापडतील. तसेच, या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासाशी संबंधित कामात यश मिळेल. जीवनात आनंद मिळेल. तुमची संपत्ती वाढेल. समाजात मान-सन्मान मिळेल. वडिलांसोबतचं नातं पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाची सरळ चाल फायदेशीर ठरू शकते. गुरु ग्रह तुमच्या राशीतून थेट भाग्यस्थानात जाणार आहे. त्यामुळे यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल. तसेच यावेळी धार्मिक कार्यात तुमची रुची वाढू शकते. या काळात तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होऊ शकते. अभ्यासात यश मिळेल. करिअरमध्ये यशस्वी होऊ शकाल. तसेच या काळात तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला जे जे हवं ते सगळं तुम्हाला मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani 2025 : अवघ्या 25 दिवसांत शनीचा अस्त; 3 राशी जगणार राजासारखं जीवन, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ




















