(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kuldeepak Rajyog 2023: तब्बल 500 वर्षांनंतर बनतोय कुलदीपक राजयोग; 'या' राशीच्या लोकांना करणार मालामाल
Guru Margi 2023: अवघ्या काही दिवसांत 2023 हे वर्ष संपणार आहे. या काळात काही महत्त्वाच्या ग्रहांचं भ्रमण होत आहे, जे मोठे बदल घडवून आणतील. वर्षाच्या शेवटी गुरुच्या प्रत्यक्ष असण्याने कुलदीपक राजयोग निर्माण होत आहे.
Guru Margi 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा ग्रह राशी बदलतात तेव्हा ते अनेक प्रकारचे शुभ-अशुभ योग आणि राजयोग वैगेरे तयार करतात. या योगांचा सर्व राशीच्या लोकांवर मोठा प्रभाव पडतो. 2023 वर्षाच्या शेवटी आणि 2024 च्या (New Year 2024) सुरूवातीलाही तेच होणार आहे. 2023 वर्षाच्या शेवटी सुख आणि सौभाग्य देणारा गुरू ग्रह थेट मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीतील गुरूच्या प्रत्यक्ष हालचालीमुळे कुलदीपक राजयोग निर्माण होणार आहे. तब्बल 500 वर्षांनंतर हा योग घडत आहे. कुलदीपक राजयोग ज्योतिष शास्त्रात विशेष मानला जातो. या वर्षी तयार होणारा हा कुलदीपक राजयोग 2024 मध्ये देखील कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) भाग्याचा ठरेल, हे जाणून घेऊया.
कुलदीपक राजयोग करणार धनाचा वर्षाव
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी कुलदीपक राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. या लोकांना नववर्षात वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. या काळात कोणतीही गुंतागुंतीची बाब सोडवता येईल. तुम्ही एखादं नवीन काम सुरू करू शकता, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कर्ज घेणं आणि देणं टाळा. सहलीला जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
सिंह रास (Leo)
कुलदीपक राजयोग सिंह राशीच्या लोकांसाठी देखील खूप शुभ परिणाम घेऊन येणारा ठरेल. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना रोजगार मिळू शकतो. तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतात. नवीन वर्षात तुमचे खर्च कमी होतील. तुमचं उत्पन्न वाढेल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. या काळात लोक तुमच्याकडे खूप आकर्षित होतील. एवढेच नाही तर या योगाच्या प्रभावाने तुमच्या स्वभावातही बरेच बदल होतील.
कुंभ रास (Aquarius)
गुरु ग्रहाच्या प्रत्यक्ष चालीमुळे तयार होत असलेला कुलदीपक राजयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगल्या दिवसांची सुरुवात करेल. कुटुंबातील वातावरण चांगलं राहील. तुमच्या आयुष्यात आनंद येईल. उत्पन्नही चांगले राहील. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा एखादं काम बिघडू शकतं. येत्या काळात कोणाशीही वाद घालू नका. आरोग्याची काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Dev: शनिची पिडा घालवण्यासाठी शनिवारी करा 'हे' उपाय; प्रत्येक समस्या होईल दूर