Guru Gochar 2025 : गुरु ग्रहाचा होणार बुध ग्रहात प्रवेश; 14 मे पासून 'या' राशींचं पालटणार नशीब, सुवर्णकाळ होणार सुरु
Guru Gochar 2025 : गुरु ग्रह जवळपास 12 वर्षांनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात. सध्या गुरु ग्रह बृहस्पती वृषभ राशीत संक्रमण करत आहेत. तर, 14 मे रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

Guru Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु (Jupiter) ग्रहाला समृद्धी, ज्ञान, ऐश्वर्य आणि आध्यात्माचा कारक ग्रह मानतात. गुरु ग्रह जवळपास 12 वर्षांनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात. सध्या गुरु ग्रह बृहस्पती वृषभ राशीत संक्रमण करत आहेत. तर, 14 मे रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. याचाच अर्थ बुध ग्रहात प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींचे चांगले दिवस लवकरच सुरु होणार आहेत. या लकी राशींच्या पद-प्रतिष्ठेत चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल. या शुभ राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रह बृहस्पतीचं राशी परिवर्तन फार सकारात्मक ठरणार आहे. या राशीची कुंडली भाग्यस्थानी संक्रमण करणार आहे. या दरम्यान तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमचं मन धार्मिक कार्यात जास्त रमेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात जास्त मन रमेल. तुमच्या वाणीत मधुरता असेल. इतकंच नव्हे तर, तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. आर्थिक योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकाल. समाजात तुमची मान-प्रतिष्ठा वाढेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी हा काळ फार चांगला आणि शुभ ठरणार आहे. या राशीच्या कर्म भावात संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुम्ही जे काही कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, जे अविवाहित आहेत त्यांना लवकरच लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुमच्यासाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. मित्र परिवाराचा तुम्हाला चांगला सहवास लाभेल. तसेच, तुमचं आरोग्यही ठणठणीत राहील.
मीन रास (Pisces Horoscope)
गुरु ग्रह बृहस्पतीचं राशी परिवर्तन मीन राशीसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या भौतिक सुख-समृद्धीत चांगली वाढ पाहायला मिळेल. तसेच, तुम्ही नवीन वाहन किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यास सक्षम असाल. विद्यार्थ्यांना नवीन कलागुण शिकता येतील. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल असणार आहे. तुम्ही सरकारी योजनांचा चांगला लाभ घेऊ शकाल. तुमच्या कामामध्ये तुमची चांगली प्रगती दिसून येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















