(Source: Poll of Polls)
Graha Gochar in September 2024 : सप्टेंबर महिन्यात ग्रहांच्या मोठ्या हालचाली! 12 राशींवर होणार परिणाम; जाणून घ्या ग्रह संक्रमणाची योग्य तारीख
Graha Gochar in September 2024 : सप्टेंबर महिन्यात सूर्य, बुध आणि शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे. यामुळे अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. या योगाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे.
Graha Gochar in September 2024 : ज्योतिष शास्त्राप्रमाणे, सर्व ग्रह एका ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. आपल्या चालीत बदल करतात तसेच अस्त आणि उदित होतात. ग्रहांच्या स्थितीनुसार, या राशी परिवर्तनाचा आपल्या आयुष्यावर फार परिणाम होतो. सप्टेंबर महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे.
सप्टेंबर महिन्यात सूर्य, बुध आणि शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे. यामुळे अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. या योगाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. तसेच, काही राशींना या दरम्यान सावध राहण्याची गरज आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
सप्टेंबर 2024 ग्रहांचं संक्रमण
सूर्य - ग्रहांचा राजा सूर्य प्रत्येक महिन्याला राशी परिवर्तन करतो. इंग्लिश कॅलेंडरनुसार, सूर्याचं संक्रमण महिन्याच्या मध्यात होणार आहे. सप्टेंबर 2024 मध्ये सूर्याचं संक्रमण 16 सप्टेंबर 2024 सोमवारच्या दिवशी होणार आहे. सूर्याचं संक्रमण कन्या राशीमध्ये प्रवेश करणाप आहे ते 17 ऑक्टोबर पर्यंत कन्या राशीत विराजमान असणार आहे.
बुध ग्रह (Mercury)
ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह जवळपास 21 दिवस एकाच राशीत विराजमान असतो. सध्या बुध ग्रह वक्री स्थितीत कर्क राशीत विराजमान आहे तर 4 सप्टेंबरपर्यंत तो याच राशीत असणार आहे. त्यानंतर सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 23 सप्टेंबर रोजी बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. अशा प्रकारे सप्टेंबर महिन्यात बुध ग्रहाचं डबल संक्रमण होणार आहे.
शुक्र ग्रह (Venus)
धन-संपदा आणि सुख-समृद्धीचा कारक शुक्र ग्रह कन्या राशीत विराजमान आहे. 18 सप्टेंबर 2024 रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचं तूळ राशीत संक्रमण केल्याने सर्व राशींच्या आर्थिक स्थितीत, लव्ह लाईफमध्ये याचा प्रभाव पडणार आहे.
सप्टेंबर महिन्यात 'या' 5 राशींनी सावध राहण्याची आवश्यकता
सप्टेंबर महिन्यात ग्रहांचं संक्रमण 5 राशींच्या लोकांसाठी फार आव्हानात्मक असणार आहे. या राशींना या महिन्यात थोडी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. या राशींमध्ये वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक आणि मकर राशींवर परिणाम होणार आहे. या काळात खर्चावर नियंत्रण ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani Dev : तब्बल 30 वर्षांनतर सूर्य आणि शनीमुळे जुळून येणार दुर्लभ योग; 'या' 3 राशींचं नशीब सोन्याहूनही पिवळं होणार