Shani Dev : तब्बल 30 वर्षांनतर सूर्य आणि शनीमुळे जुळून येणार दुर्लभ योग; 'या' 3 राशींचं नशीब सोन्याहूनही पिवळं होणार
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य सध्या सिंह राशीत विराजमान आहे. तर, शनी कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे या दोघांच्या दरम्यान समसप्तक योग जुळून येणार आहे.
Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती वेळोवेळी बदलते. यामुळे अनेक शुभ आणि अशुभ योगांची निर्मिती होते. याचा प्रभाव मानवी जीवनावर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य (Sun) सध्या सिंह राशीत (Leo Horoscope) विराजमान आहे. तर, शनी कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे या दोघांच्या दरम्यान समसप्तक योग (Yog) जुळून येणार आहे. याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर होणार आहे.
या दरम्यान 3 राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या राशींचं भाग्य उजळू शकतं. या राशींच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी समसप्तक योग फार अनुकूल सिद्ध होणार आहे. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. व्यापारी वर्गातील लोकांना चांगला लाभ मिळेल. या दरम्यान तुमची चांगली व्यावसायिक डील होऊ शकते. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्ही करत असलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. पण कोणाबरोबर पैशांचा व्य
मिथुन रास (Gemini Horoscope)
समसप्तक योग जुळून आल्याने मिथुन राशीच्या लोकांचे लवकरच चांगले दिवस सुरु होणार आहेत. या दरम्यान तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, पैशांची गुंतवणूक करण्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला देश-विदेशात फिरण्याची संधी मिळेल. तसेच, या दरम्यान जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करु इच्छित असाल तर त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी समसप्तक योग फार शुभदायी ठरणार आहे. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन फार चांगलं असेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे नवीन घर, वाहन खरेदी करण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Astrology Panchang 30 August 2024 : आज वेशी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृषभसह 5 राशींवर बरसणार देवी लक्ष्मीची कृपादृष्टी