(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Grah Gochar September 2022 : 'या' राशींसाठी 17 आणि 24 सप्टेंबरचा दिवस आहे खास, मोठा लाभ होणार
Grah Gochar September 2022 : ग्रहांच्या बदलामुळे 17 आणि 24 सप्टेंबर या राशींसाठी खूप शुभ ठरणार आहेत. या दिवशी या राशीचे लोक मोठी कमाई करू शकतात.
Grah Gochar September 2022 : सप्टेंबर महिन्यात काही ग्रहांच्या राशी किंवा हालचालीमध्ये बदल झाला आहे. ग्रहांच्या बदलामुळे 17 आणि 24 सप्टेंबर या राशींसाठी खूप शुभ ठरणार आहेत. या दिवशी या राशीचे लोक मोठी कमाई करू शकतात. या तारखांमध्ये दोन मोठे ग्रह राशी बदलणार आहेत. ग्रहांच्या या बदलांमुळे या महिन्यात काही उलथापालथ होईल.
पंचांगानुसार बुध ग्रहानंतर सूर्यही राशी बदलेल. 17 सप्टेंबर रोजी सूर्य सिंह राशी सोडून कन्या राशीत प्रवेश करेल. 17 सप्टेंबर रोजी सकाळी सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल.
शुक्र संक्रमण
या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 24 सप्टेंबरला शुक्र कन्या राशीत प्रवेश करेल. शुक्राचे संक्रमण 24 सप्टेंबर रोजी सकाळी 8:51 वाजता कन्या राशीत होईल. शुक्र संक्रमणाचा या राशींवर सकारात्मक प्रभाव पडेल.
मिथुन : या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण शुभ सिद्ध होणार आहे. त्यांना समाजात मान-सन्मान मिळेल. संबंध दृढ होतील. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील.
धनु : कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाचे कौतुक होईल . व्यवसायात नफा वाढेल. भागीदारीत केलेला व्यवसाय चांगला राहील.
मेष : या राशीच्या लोकांना सूर्याच्या भ्रमणामुळे शुभ परिणाम मिळतील. त्यांची रखडलेली कामे मार्गी लागतील. तुमचे प्रत्येक काम यशस्वी होईल. तब्येत ठीक राहील. जुन्या आजारांपासून आराम मिळेल.
कर्क : या काळात तुमचे कौटुंबिक जीवन अद्भुत असेल. समाजात मान-सन्मान मिळेल. कौटुंबिक जीवन यशस्वी होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. प्रत्येक कामात यश मिळेल.
वृषभ : ग्रहांच्या राशी बदलामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल . कुठूनही पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील.
कुंभ : तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील . आर्थिक स्थिती मजबूत राहील. पैसा जमवण्यात यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या