Gemini Weekly Horoscope : येणारे 7 दिवस मिथुन राशीसाठी खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Gemini Weekly Horoscope 06 To 12 January 2025 : मिथुन राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मिथुन राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Gemini Weekly Horoscope 06 To 12 January 2025 : हिंदू कॅलेंडरनुसार, जानेवारी महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा मिथुन (Gemini) राशीसाठी नेमका कसा असणार आहे? मिथुन राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मिथुन राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मिथुन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मिथुन राशीची लव्ह लाईफ (Gemini Love Horoscope)
तुमच्या नात्यात सुरू असलेले वाद या आठवड्यात संपतील. प्रियकरासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याला तुम्ही महत्त्व द्याल. पुन्हा वाद घालू नका. लग्नासाठी तुम्ही पालकांची परवानगी घेऊ शकता. विवाहित लोकांनी ऑफिस रोमान्सपासून दूर राहावं, कारण तुमच्यात आणि तुमच्या सहकाऱ्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे. लांबच्या नातेसंबंधात असलेल्यांना अधिक बोलण्याची आवश्यकता असेल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी चांगले असतील. तुम्हाला तुमच्या क्रशकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो.
मिथुन राशीचे करिअर (Gemini Career Horoscope)
नोकरीत त्रास देत असलेल्यांकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही सर्व कामं दिलेल्या वेळेत पूर्ण करत असल्याची खात्री करा. काही आयटी व्यावसायिक आणि इंजिनीअर कामासंबंधी परदेशात जाऊ शकतात. हेल्थकेअर, हॉस्पिटॅलिटी आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील लोकांचं वेळापत्रक खूप व्यस्त असेल. टीम मीटिंगमध्ये तुमचा दृष्टिकोन महत्त्वाची भूमिका बजावेल. क्लायंटला प्रभावित करण्यासाठी तुमच्या संवाद कौशल्याचा पुरेपूर वापर करा. व्यावसायिकांना नवीन भागीदारी मिळू शकते.
मिथुन राशीची आर्थिक स्थिती (Gemini Wealth Horoscope)
तुमच्यासमोर या आठवड्यात कोणतीही मोठी आर्थिक आव्हानं असणार नाही. याचा अर्थ तुम्ही आवश्यक असलेल्या गोष्टींवर पैसे खर्च करण्यास मोकळे व्हाल. मात्र, खर्च आणि उत्पन्नाचा समतोल राखणं आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि फर्निचर खरेदीसाठी काळ उत्तम राहील. काही पुरुष नवीन वाहन खरेदी करतील. व्यावसायिकांना निधी उभारण्यात यश मिळेल.
मिथुन राशीचे आरोग्य (Gemini Health Horoscope)
या आठवड्यात काही लोकांना हार्ट किंवा छातीशी संबंधित समस्या जाणवू शकतात. पाण्यातील खेळांसारख्या साहसी क्रियाकल्पांमध्ये सहभाग घेताना थोडी सावधगिरी बाळगा. दुचाकी चालवताना हेल्मेट जरूर घाला. काही ज्येष्ठांना हाडांमध्ये वेदना जाणवू शकतात. खेळाडूंना किरकोळ समस्या जाणवतील. या आठवड्यात तुम्हाला पचनाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे बाहेरचं काही खाताना सावधगिरी बाळगा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Taurus Weekly Horoscope : पुढचे 7 दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी कसे असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य