![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Garud Puran : बायकोच्या मागे दुसरीसोबत अनैतिक संबंध ठेवताय? तर सांभाळून, मृत्यूनंतर थेट नरकात जागा, गरुड पुराण म्हणते...
Garuda Purana : गरुड पुराणात चांगल्या आणि वाईट कर्मांचं वर्गीकरण करण्यात आलं आहे आणि याच्याच आधारावर व्यक्तीला मृत्यूनंतर स्वर्ग-नरकात पाठवण्यात येतं. जो व्यक्ती बायकोला फसवून दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवतो त्याला मृत्यूनंतर नरकात पाठवलं जातं, तिथे त्याला भयंकर शिक्षा दिली जाते.
![Garud Puran : बायकोच्या मागे दुसरीसोबत अनैतिक संबंध ठेवताय? तर सांभाळून, मृत्यूनंतर थेट नरकात जागा, गरुड पुराण म्हणते... Garud Puran sin punishments know what punishment person gets when he cheats on his wife and keeps extra marital affair Garud Puran : बायकोच्या मागे दुसरीसोबत अनैतिक संबंध ठेवताय? तर सांभाळून, मृत्यूनंतर थेट नरकात जागा, गरुड पुराण म्हणते...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/14/beca115c231105e8730170a6df9aca461710408381697713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Garuda Purana : माणसाच्या पापांचा घडा कधीतरी भरतोच, ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. मृत्यूनंतर व्यक्तीला त्याने केलेल्या पापांसाठी भयंकर वेदना भोगाव्या लागतात. आता ही पाप-पुण्याची गणना कशानुसार होते? तर गरुड पुराणात माणसांच्या सत्कर्म आणि दुष्कर्मांबद्दल सांगण्यात आलं आहे. मृत्यूनंतर आपल्या कर्माची गणना होते आणि त्यानुसार आपल्याला स्वर्गवास किंवा नरकवास लाभतो. गरुड पुराणात काही गोष्टी या अतिशय चुकीच्या समजल्या जातात आणि त्यांची गणना पापांमध्ये होते, यापैकी एक गोष्ट म्हणजे - परस्त्रीशी संबंध ठेवणे.
जो व्यक्ती बायकोची फसवणूक करुन परस्त्रीशी संबंध ठेवतो किंवा जी स्त्री नवऱ्याची फसवणूक करुन दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवते, अशा व्यक्तींना मृत्यूनंतर नरकवास लाभतो आणि त्याचा फार छळ केला जातो. एकाच वेळी अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणं देखील पाप आहे. आणि गरुड पुराणात अशा अनेक पापांसाठी विविध शिक्षांबदद्ल सांगण्यात आलं आहे. गरुड पुराणात कोणत्या पापांसाठी कोणती शिक्षा? जाणून घ्या
तामिस्र नरक
जो व्यक्ती दुसऱ्याची बायको-मुलं चोरतो, दुसऱ्याची धन-संपत्ती चोरतो आणि दुष्कर्म करतो, तो हा नरक भोगतो. चोरीशी संबंधित या नरकात भयंकर अंधार आहे. या नरकात पापी जीवाला बेशुद्ध होईपर्यंत लाठीने मारुन त्याचा छळ केला जातो. आणि जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा पुन्हा त्याचा यमदूतांकडून छळ केला जातो. हा क्रम कित्येक शे वर्षे चालू राहतो.
अंधतामिस्र नरक
जो व्यक्ती आपल्या पत्नीला फसवतो आणि दुसऱ्या स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवतो तो या नरकात जातो. तसेच जी स्त्री आपल्या नवऱ्याच्या मागे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवते, ती देखील या नरकात जाते. येथे पापी व्यक्तीला रोज अनेक प्रकारच्या वेदना रोज दिल्या जातात, त्याच्या शरीराचे ठिकठिकाणी तुकडे केले जातात. अंधतामिस्रात पोहोचण्याआधीच, पापी जीव विविध प्रकारच्या दुःखांना बळी पडतो. दुसऱ्याच्या बायकोसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्याचा नरकात वाईट छळ होतो. विद्वान ऋषी या नरकाला अंधतामिस्र, अंधकारमय नरक असं म्हणतात .
तप्तसूर्मि नरक
जर एखादी व्यक्ती वासनेने भरलेली असेल आणि अनेक स्त्रियांशी संबंध ठेवत असेल तर यमदूत त्याला तप्तसूर्मि नावाच्या नरकात पाठवतो. या नरकात तो पापी जीव तळपत्या लोखंडी जाड सळईभोवती गुंडाळला जातो. ज्यांचे पती किंवा पत्नीव्यतिरिक्त इतर कोणाशी शारीरिक संबंध आहेत, त्यांच्या अंगावर जळत राहणारा लोखंड टाकला जातो आणि त्याला चाबकाने मारहाण केली जाते.
गरुड पुराणानुसार जो व्यक्ती जसे पाप करतो, त्याला तसे परिणाम भोगावे लागतात. जे धार्मिक आणि सद्गुरू लोक असतात ते स्वर्गात जातात आणि विविध प्रकारच्या सुखसोईंचा उपभोग घेतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)