Ganesh Chaturthi 2025 : यावर्षी पहिल्यांदाच घरी गणपतीची स्थापना करताय? मग, 'हे' 7 नियम नेहमी लक्षात ठेवा, अन्यथा...
Ganesh Chaturthi 2025 : जर तुम्ही सुद्धा यंदाच्या गणेश चतुर्थीला गणरायाची स्थापना करणार असाल. तर, काही खास गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवाचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. 27 ऑगस्ट 2025 रोजी घरोघरी तसेच, सार्वजनिक ठिकाणी बाप्पा विराजमान होणार आहेत. जर तुम्ही सुद्धा यंदाच्या गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) गणरायाची स्थापना करणार असाल. तर, काही खास गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
शाडूची मूर्ती घरात आणा
शास्त्रानुसार, जर तुम्ही यंदाच्या गणेशोत्सवाला गणपतीची स्थापना करणार असाल तर, शाडूची मूर्ती घरात आणा. तसेच, गणरायाची सोंड डाव्या बाजूला असावी. तसेच, मूर्ती विराजमान अवस्थेत असावी. तसेच, गणपतीच्या बरोबर उंदीरमामा देखील असावा.
मूर्तीची जागा हलवू नये
गणपतीची मूर्ती स्थापन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की, मूर्तीची जागा जागेवरुन हलवू नका. एकदा मूर्ती विराजमान केल्यानंतर थेट विसर्जनाच्या दिवशीच तुम्ही मूर्ती हलवू शकता.
गणपती योग्य दिशेला स्थापित करावी
गणरायाची स्थापना करताना ब्रह्म मुहूर्त, पूर्व दिशा आणि उत्तर पूर्व कोण शुभ मानला जातो. चुकूनही दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला स्थापना करु नये.
गणपतीची आरती करावी
अनेक लोक 1, 3, 5 किंवा 10 दिवसांसाठी गणपतीची स्थापना करतात. त्यामुळे जितके दिवस गणपती घरी विराजमान आहेत. तितके दिवस सकाळ-संध्याकाळ त्यांची आरती करावी. तसेच, नैवेद्य दाखवावा.
स्थापनेच्या जागी अंधार ठेवू नका
तसेच, जितके दिवस बाप्पा घरी विराजमान आहेत तितके दिवस घर कधीच एकटं सोडू नका. तसेच, स्थापनेच्या जागी अंधार ठेवू नका. या कालावधीत रोज साफसफाई करा. तामसिक आहाराचं सेवन करु नका.
मूर्तीची विशेष काळजी घ्या
बाप्पाला घरी आणताना किवा मूर्ती खरेदी करताना मूर्तीला कुठेही तडा जाणार नाही या गोष्टीची विशेष काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















