![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ganesh Chaturthi 2024 : सुख असो वा दु:ख 'या' 5 राशींवर असते गणरायाची कृपा; पुढचे 10 दिवस असतील सुखाचे
Ganesh Chaturthi 2024 : गणपतीच्या कृपेने घरात सुख-समृद्धी नांदते. तसेच, भक्तांची सर्व विघ्न दूर होतात अशी मान्यता आहे.
![Ganesh Chaturthi 2024 : सुख असो वा दु:ख 'या' 5 राशींवर असते गणरायाची कृपा; पुढचे 10 दिवस असतील सुखाचे Ganesh Chaturthi 2024 lord ganesha favourite 5 zodiac signs these people will get immense money Ganesh Chaturthi 2024 : सुख असो वा दु:ख 'या' 5 राशींवर असते गणरायाची कृपा; पुढचे 10 दिवस असतील सुखाचे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/08/05ce1b417cf45214b0d8fc97b1294d2e1725771539715358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ganesh Chaturthi 2024 : गणरायाला (Lord Ganesh) सनातन धर्मात प्रथम पूजनीय मानले जाते. गणपतीच्या कृपेने घरात सुख-समृद्धी नांदते. तसेच, भक्तांची सर्व विघ्न दूर होतात अशी मान्यता आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही शुभ संयोग जुळून आले आहेत ज्यामुळे येणारे 10 दिवस काही राशीच्या लोकांसाठी फार खास असणार आहेत. या राशी (Zodiac Signs) कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
ज्योतिष शास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी गणपतीचे हे दिवस फार खास असणार आहेत. भगवान गणेशाला या राशीचे लोक फार प्रिय आहेत. बाप्पा या राशीची सर्व कार्य अगदी निर्विघ्नपणे पूर्ण करतात. इतकंच नव्हे तर या राशीच्या जीवनात कधीच पैशांची कमतरता भासत नाही. तसेच, करिअरमध्ये चांगली प्रगती होते.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन रास ही दुसरी रास भगवान गणेशाला प्रिय आहे. या राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास भगवान गणपती यांची मदत करतात. या राशीचे लोक फार बुद्धिवान असतात. तसेच, येणाऱ्या संकटाचा सामना कसा करायचा हे त्यांना माहित असतं. समाजात यांचा मान-सन्मान वाढतो. गणेशाच्या कृपेने यांची बिघडलेली कामे ठीक होतात.
मकर रास (Capricorn Horoscope)
ज्योतिष शास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांवर सतत भगवान गणेशाची कृपा दृष्टी असते. या राशीच्या लोकांना बाप्पा आर्थिक संकटांपासून दूर ठेवतो. तसेच, या राशीच्या लोकांना प्रत्येक कार्यात चांगलं यश मिळतं. रखडलेली कामे पूर्ण होतात. तसेच, विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगलं यश मिळेल. परीक्षेत तुम्हाला चांगले गुण मिळतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांना गणपती नेहमी सुखी आणि संपन्न ठेवतात. भगवान गणेश या राशीच्या लोकांना प्रत्येक संकटांपासून दूर ठेवतात. तसेच, तुम्हाला करिअरमध्ये योग्य उंची गाठण्यासाठी मदत करतात. दुसऱ्यांना मदत करणं हा यांचा स्वभाव असल्या कारणाने बाप्पा नेहमी यांच्या पाठीशी असतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Astrology Yog : तब्बल 30 वर्षांनंतर सूर्य आणि शनीमुळे जुळून आला पॉवरफुल योग; 'या' राशीचे लोक जगतील राजासारखं आयुष्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)